मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळवणे होईल आता अधिक सोपे, जाणून घ्या कसे?

Image credit: IANS
Image credit: CMO Maharashtra

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळण्यासाठी संबंधित निकष ठरवण्यासाठी शिफारशी करण्याबाबत समिती गठीत करण्यात आलीय. 

आजारांचे पुनर्विलोकन करणे, अर्थसहाय्याची रक्कम नव्याने निश्चित करणे, रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरवण्याच्या शिफारशी करण्याबाबत समिती गठीत केली गेलीय. 

Image credit: CMO Maharashtra

याबाबत शासन निर्णय काढण्यात आला असल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.

Image credit: CMO Maharashtra
Image credit: PTI

बैठकीमध्ये कोणकोणत्या निकषांचा समावेश करण्यात आलाय, त्याबाबत माहिती जाणून घेऊया...

Image credit: Canva

मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून मदत मिळण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या 20 आजारांपैकी इतर शासकीय योजनेत समाविष्ट असलेल्या आजारांचे पुनर्विलोकन करणे.

Image credit: Canva

सहाय्यता मिळण्यासाठी नवीन आजार समाविष्ट करण्याबाबत शिफारस करणे.

Image credit: Canva

रस्ते अपघात वगळून इतर अपघात प्रकरणामध्ये घ्यावयाच्या कागदपत्रांची निश्चिती करणे.

Image credit: Canva

आजारांना देण्यात येणाऱ्या अर्थसहाय्यांच्या रकमांचे पुनर्विलोकन (समीक्षण) करुन मंजूर रक्कम नव्याने निर्धारित करण्याची शिफारस करणे.

Image credit: Canva

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना, केंद्र-राज्य सरकारच्या वैद्यकीय उपचाराबाबत असलेल्या इतर योजनांच्या धर्तीवर निकष ठरवण्याबाबत शिफारस करणे.

Image credit: CM Devendra Fadnavis X

वरील सर्व शिफारशींकरिता ही समिती गठित करण्यात आल्याचे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख नाईक यांनी सांगितले.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने वैद्यकीय उपचाराबाबत विविध विषयांच्या अनुषंगाने विचारणा केल्यास समिती शिफारस सादर करेल,असेही त्यांनी सांगितले.

Image credit: CM Devendra Fadnavis X
Image credit: IANS

यामुळे मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळवणे अधिक सोपे होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जातेय. 

आणखी वाचा

 अटल सेतूच्या टोलबाबत फडणवीस सरकारचा मोठा निर्णय 

marathi.ndtv.com