महाराष्ट्राचे मुख्य सचिव राजेश कुमार यांनी आतापर्यंत भूषवली ही महत्त्वाची पदे

Edited by Harshada J S  Image credit: Maha DGIPR X
Image credit: Maha DGIPR X

राज्याच्या मुख्य सचिवपदी शासनाने महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव राजेश कुमार यांची नियुक्ती केलीय.

Image credit: Sanjeev Jaiswal (I.A.S.) X

मंत्रालयातील मुख्य सचिवांच्या दालनात मावळत्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्याकडून त्यांनी 49 वे मुख्य सचिव म्हणून पदभार स्वीकारला.

मुख्य सचिव राजेश कुमार यांचा अल्पपरिचय आणि त्यांनी आतापर्यंत भूषवलेली पदे याबाबत माहिती जाणून घेऊया.

Image credit: Maha DGIPR X

मुख्य सचिव राजेश कुमार यांचा जन्म 3 ऑगस्ट 1965 रोजी झाला. 25 ऑगस्ट 1988 रोजी ते भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. 

Image credit: Maha DGIPR X

मूळचे राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील असलेल्या राजेश कुमार यांनी इतिहास या विषयात पदव्युत्तर पदवी मिळवलेली आहे.

Image credit: Maha DGIPR X
Image credit: Rajan Naik Insta

राजेश कुमार यांनी यापूर्वी सोलापूर येथे अधिसंख्य साहाय्यक जिल्हाधिकारी पदापासून 24 जुलै 1989 रोजी आपल्या कारकिर्दीस सुरूवात केली.

Image credit: Canva

राजेश कुमार यांनी आतापर्यंत कोणकोणत्या पदांवर काम केले आहे, याबाबत माहिती जाणून घेऊया...

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

सातारा येथे साहाय्यक जिल्हाधिकारी,बीड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी,अमरावती येथे आदिवासी विकास अपर आयुक्त

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

धाराशीव जिल्हाधिकारी,जळगाव जिल्हाधिकारी, सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त,केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खासगी सचिव

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

नाशिक येथे आदिवासी विकास आयुक्त,नवी मुंबई येथे एकात्मिक बालविकास आयुक्त, मंत्रालयात पाणीपुरवठा विभागाचे प्रधान सचिव

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

उद्योग, ऊर्जा आणि कामगार विभागाचे अपर मुख्य सचिव, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव 

प्रतिकात्मक फोटो
Image credit: Canva

सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव तसेच महसूल आणि वन विभागाचे अपर मुख्य सचिव आदी महत्त्वपूर्ण पदांवर त्यांनी काम केलंय. 

प्रतिकात्मक फोटो

आणखी वाचा

आषाढी एकादशीला पंढरपुरात जायचंय? राहण्याची सोय, खर्च-बुकिंगची माहिती वाचा

marathi.ndtv.com