आषाढी एकादशीला पंढरपुरात जायचंय? राहण्याची सोय, खर्च-बुकिंगची माहिती वाचा

Edited by Harshada J S Image credit: Sanket Kulkarni
Image credit: Sanket Kulkarni

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात 15 लाख भाविक येण्याचा अंदाज आहे. 

Image credit: Sanket Kulkarni

या पार्श्वभूमीवर शहरात भाविकांच्या राहण्यासाठीची सोय उपलब्ध करून दिली जात आहे. 

Image credit: Sanket Kulkarni

भाविकांसाठी शहरात 1250 मठ, 100 भक्त निवास तसंच शासनाचे मोफत निवारा शेड उपलब्ध असणार आहेत. 

Image credit: Sanket Kulkarni

मोठे भक्तनिवास किंवा लॉजमधील रूम 700 रुपयांपासून ते 2,000 रुपयांपर्यंत मिळतात. काही वेळा याचे अ‍ॅडव्हान्स बुकिंग होत असते.

Image credit: Sanket Kulkarni

चांगल्या दर्जाच्या सुविधा देणाऱ्या हॉटेलमध्ये दशमी, एकादशी, द्वादशी अशा तीन दिवसांच्या वास्तव्यासाठी 30,000 ते 50,000 रुपयांपर्यंतचे पॅकेज असते. 

Image credit: Sanket Kulkarni

अनेक भक्त निवासांचे बुकिंग yatradham.com या संकेतस्थळावरून सहज होते.

Image credit: Sanket Kulkarni

यंदाच्या वारीमध्ये भाविकांच्या वास्तव्यासाठी शासनाच्या माध्यमातून विशेष निवाराशेड उभा करण्यात आलेले आहेत. 

Image credit: Sanket Kulkarni

मागील वर्षापर्यंत एकात्मिक निवारा शेडच्या माध्यमातून शहराच्या चारही बाजूला मोठे मंडप उभे केले होते.

Image credit: Sanket Kulkarni

या मंडपांमध्ये भाविकांना पिण्याचे पाणी, स्नानगृह, स्वच्छतागृह, मोबाइल चार्जरची सुविधा अशा सेवांसह मोफत वास्तव्यासाठीचे शासनाचे निवारा शेड उपलब्ध होतात. 

Image credit: Sanket Kulkarni

या शेडपासून विठ्ठल मंदिराचे अंतर 4 ते 5 किलोमीटरपर्यंत असले तरी भाविकांची मोफत राहण्याची व्यवस्था याच ठिकाणी होणार आहे.

Image credit: Sanket Kulkarni

मंदिराच्या नगरप्रदक्षिणा परिसरापासून ते शहराच्या चारही बाजूंना वारकरी सांप्रदायिक मठ स्थापित आहेत. या मठांची किमान संख्या 1250 इतकी आहे. 

Image credit: Sanket Kulkarni

याव्यतिरिक्त आजही भाविक विठ्ठल मंदिर परिसरातील स्थानिकांच्या घरांमध्ये वास्तव्य करतात. 

Image credit: Sanket Kulkarni

अगदी 100 रुपयांपासून ते 500 रुपयांपर्यंत स्थानिकांच्या घरामध्ये वास्तव्यासाठी जागा मिळते. 

Image credit: Sanket Kulkarni

मंदिर परिसरातच वास्तव्य असल्याने भाविकांना चंद्रभागा नदी, विठ्ठल मंदिर आणि नगरप्रदक्षिणा अगदी हाकेच्या अंतरावर असते. 

आणखी वाचा

पुणे होणार सुसाट! नव्या मेट्रोचा मार्ग, स्टेशनची संख्या, प्रकल्पाची किंमत वाचा एका क्लिकवर

marathi.ndtv.com