ठाकरे बंधुंच्या मनोमिलनाची शक्यता, ही आहेत 10 मोठी कारणे
Edited by Harshada J SImage credit: PTI
Image credit: PTI
बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा: राज ठाकरेंनी मनसेची स्थापना केल्यानंतरही ठाकरे बंधुंनी एकत्र यावे अशी बाळासाहेबांची प्रबळ इच्छा होती.
Image credit: IANS
मराठी अस्मितेचा मुद्दा: शिवसेनेची स्थापनाच मुळात मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी झाली होती. आजही हा मुद्दा ठाकरे बंधुंची सेना प्रकर्षाने मांडतात.
Image credit: PTI
प्रादेशिक अस्मिता: दक्षिणेकडील राज्यांत प्रादेशिक पक्ष ज्या पद्धतीने प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा लावून धरतात, स्वतःचे स्थान बळकट करतात तसे दोन्ही सेनांना जमलेले नाही.
Image credit: PTI
महाराष्ट्रात आपल्याला संधी असल्याचे ठाकरे बंधुंना वाटते आहे.
Image credit: IANS
निवडणुकीतील अपयश: मनसेला निवडणुकीत सातत्याने अपयश मिळालंय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची कामगिरी 2024च्या विधानसभा निवडणुकीत समाधानकारक नव्हती.
Image credit: PTI
मविआतील मतभेद: महाविकास आघाडीमध्ये अनेक मुद्यांवरुन मतभेद निर्माण झाले असून मोठ्या प्रमाणात कुरबुरीही सुरू झाल्या आहेत.
Image credit: IANS
हिंदुत्वाचा मुद्दा: ठाकरे बंधुंना आपले राजकारण पुढे नेण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेणं आवश्यक आहे, याकरिता त्यांना एकमेकांचा पाठिंबा निर्णायक ठरू शकतो.
Image credit: IANS
पुढच्या पिढीचे राजकारण: ठाकरेंची पुढची पिढी ही सक्रीय राजकारणात उतरलीय.
Image credit: PTI
स्वतःच्या पक्षाचे स्थान बळकट झाल्यास अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरेंची पुढची राजकीय वाटचाल अधिक सुकर होईल.
Image credit: PTI
राष्ट्रीय पक्षांविरोधातील भूमिका: काँग्रेस आणि भाजप हे दोन राष्ट्रीय पक्ष असून त्यांचे वर्चस्व दोन्ही ठाकरेंना फारसे रुचणारे नाही.
Image credit: PTI
कार्यकर्त्यांची मने जुळण्याची शक्यता: इतर पक्षांच्या तुलनेत ठाकरे बंधूंच्या शिवसैनिकांची मने जुळण्यास फारशी अडचण येणार नाही.
Image credit: IANS
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका: या निवडणुका दोन्ही ठाकरेंसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत.
Image credit: PTI
खासकरून मुंबई, ठाणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरच्या निवडणुका या आव्हानात्मक असून दोन्ही सेना एकत्र आल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे.
आणखी वाचा
उद्धव ठाकरेंनी हिंदी भाषेबाबत घेतली महत्त्वाची भूमिका, म्हणाले...