शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन! पुण्यात शेवग्याच्या शेंगांना विक्रमी दर

Edited by Harshada J S Image credit: Canva

किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याच्या शेंगांना प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलो भाव मिळत आहे.

Image credit: Canva

दक्षिणेकडील राज्यांमध्ये झालेल्या पावसाचा शेवग्याच्या लागवडीला फटका बसला.

Image credit: PTI

यामुळे बाजारात शेवग्याच्या शेंगांची आवक कमी झालीय.

Image credit: Canva

मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने किरकोळ बाजारात एक किलो शेवग्याला प्रतवारीनुसार 500 ते 600 रुपये किलो भाव मिळत आहे.

Image credit: Canva

मुंबई, ठाणे, पुण्यासह अन्य शहरांतील बाजारपेठेत शेवग्याच्या दराने उच्चांक गाठला आहे. 

Image credit: Canva

शेवग्याची सर्वाधिक लागवड तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशात होते. 

Image credit: Canva

एरवी भाव 100-120 रुपये किलोच्या आसपास असणाऱ्या शेवग्याला दक्षिणेकडे सुरू असलेल्या पावसाचा फटका बसलाय. 

Image credit: Canva

यामुळेच शेंगांचा घाऊक बाजारात 10 किलोचा दर 3500 ते 4000 रुपयांपर्यंत पोहोचलाय. 

Image credit: Canva

नवी मुंबईतील कृषि उत्पन्न बाजार समितीमध्येही शेवग्याची आवक घटलीय. डिसेंबरअखेरीस आवक वाढल्यानंतर दरात घट होईल, असे व्यापारी सांगताहेत. 

Image credit: Canva

आणखी वाचा

श्री तुळजाभवानी देवीचरणी 11 तोळे सोन्याची माळ अर्पण

marathi.ndtv.com