महाविकास आघाडीचे सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन 

Edited by Harshada J S
Image credit: ShivSenaUBT X
Image credit: Maharashtra Congress X

मालवण येथे राजकोट किल्ल्यावर झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा दुर्घटनेच्या निषेधार्थ मविआने जोडे मारो आंदोलन केले.

हुतात्मा चौक ते गेट वे ऑफ इंडियापर्यंत हे आंदोलन करण्यात आले. 

Image credit: Maharashtra Congress X
Image credit: Maharashtra Congress X

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उभारणीमध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या व निकृष्ट दर्जाचे काम केल्याचा आरोप करत सरकारविरोधात निषेध नोंदवण्यात आला.

Image credit: Maharashtra Congress X

शिवसेना पक्षप्रमुख (उबाठा) उद्धव ठाकरे यांनी सरकारला 'गेट आऊट ऑफ इंडिया' अशा शब्दांत खडेबोलही सुनावले.

Image credit: Maharashtra Congress X

मोर्च्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे (राशप) अध्यक्ष शरद पवारही उपस्थित होते. 

छत्रपती शिवाजी महाराजांचा या सरकारने अपमान केला, असं म्हणत शरद पवारांनीही टीकास्त्र सोडले. 

Image credit: Maharashtra Congress X
Image credit: Maharashtra Congress X

काँग्रेस खासदार शाहू महाराज छत्रपतीही आंदोलनामध्ये सहभागी झाले होते.

Image credit: ShivSenaUBT X

महाराजांचा मान हा राखला गेलाच पाहिजे, असे म्हणत शाहू महाराजांनी सरकारवर टीका केली. 

आणखी वाचा

PM मोदींनी महाराष्ट्रातल्या या 9 पॉवरफुल महिलांचे केले कौतुक, म्हणाले

marathi.ndtv.com