Khel Ratna Award: मनू भाकर, डी गुकेशसह 4 खेळाडूंना ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर
Edited by Harshada J S Image credit: ANI/PTI क्रीडा मंत्रालयाने वर्ष 2024साठीचे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार जाहीर केले आहेत. यंदा 4 खेळाडूंची ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी निवड करण्यात आलीय.
Image credit: IANS वर्ल्ड चेस चॅम्पियन ग्रँडमास्टर डी गुकेश, हॉकी टीम कॅप्टन हरमनप्रीत सिंगला ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जाहीर करण्यात आलाय.
Image credit: PTI पॅरा ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट प्रवीण कुमार, नेमबाज मनू भाकर यांनाही ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Image credit: ANI/PTI या खेळाडूंना राष्ट्रपती भवनामध्ये 17 जानेवारीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
Image credit: PTI मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक जिंकले होते. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदक जिंकणारी मनू ही पहिली भारतीय खेळाडू ठरलीय.
Image credit: PTI पॅरिस ऑलिम्पिकमध्ये हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतीय हॉकी टीमने कांस्य पदक जिंकले होते.
Image credit: ANI 18 वर्षांच्या डी गुकेशनं सर्वात लहान वर्ल्ड चॅम्पियन होण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे.
Image credit: PTI पॅरा हाय जम्पर प्रवीणने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये T64 श्रेणीमध्ये सुवर्णपदक जिंकले होते.
Image credit: ANI दरम्यान नेमबाज स्वप्नील कुसाळेसह 32 खेळाडूंना अर्जुन पुरस्कारही जाहीर करण्यात आलाय, ज्यामध्ये 17 पॅरा अॅथलिट्सचा समावेश आहे.
Image credit: xyz आणखी वाचा
PV Sindhu: नांदा सौख्य भरे! फुलराणी पीव्ही सिंधूने शेअर केले लग्नाचे फोटो
marathi.ndtv.com