जितेंद्र जोशीची 'लुक्खी पोस्ट' आणि त्यावरील भन्नाट प्रतिक्रिया
Edited by Harshada J SImage credit: Jitendra Joshi Instagram
अभिनेता जितेंद्र जोशीने सोशल मीडियावर एका फोटोसह लक्षवेधी पोस्ट शेअर केली आहे. नेमकी काय आहे ही पोस्ट? जाणून घेऊया...
Image credit: Jitendra Joshi Instagram
आयुष्याचा टेम्पो बिघडू नये म्हणून निसर्गात माणूस आजन्म शिकत आणि शिकवत राहतो, असे पोस्ट शेअर करत त्यानं संदर्भासहीत स्पष्टीकरण दिलंय.
Image credit: Jitendra Joshi Instagram
चित्रात तू फक्त ईशारा कर मी लगेच आलो- म्हणताना व्यक्ती प्रेमाप्रती तत्पर दिसून येते. शिवाय केवळ इशारा समजणारी असल्याने साईन लँग्वेजचा अभ्यास केल्याचे जाणवते.
Image credit: Jitendra Joshi Instagram
'आईची वेडी माया' - यात आईविषयीची कृतज्ञता-प्रेम डोकावते व ही व्यक्ती कौटुंबिक असल्याचा दाखला मिळतो.
Image credit: Jitendra Joshi Instagram
वडिलांविषयी फारशी उकल होत नाही, अन्यथा अशा वेळी 'आईवडिलांचा आशीर्वाद' असा उल्लेख केलेला सहसा आढळतो, असेही जितेंद्रने पोस्टमध्ये नमूद केले आहे.
Image credit: Jitendra Joshi Instagram
'आपलेच गद्दार' व 'मित्र असावा पण कपटी नसावा' -ही दोन वाक्य राजकारणाशी संबंधित वाटू शकतात परंतु ही वाक्य समाजमनात, दारूच्या टेबलवर जगत मान्य आहेत.
Image credit: Jitendra Joshi Instagram
'परी नसावी पण प्रेम खरं करणारी असावी'- हे वाक्य वास्तव, अपेक्षा आणि इतर सर्व गोष्टींची उकल करणारं आहे.
Image credit: Jitendra Joshi Instagram
जग पालथे घालायला निघताना तिला चित्रात का होईना पण गुलाब द्यायला आणि इतर वाटसरुंना चार गोष्टी शिकवायला चालक/मालक विसरत नाही, असेही जितेंद्रने लिहिलंय.
Image credit: Jitendra Joshi Instagram
या व्यक्तीस योग्य इशारा करून खरं प्रेम देणारी मिळून त्याच्या मुलांना आईची वेडी माया मिळो हीच प्रार्थना, असेही जितेंद्र जोशीने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय.
Image credit: Jitendra Joshi Instagram
तुम्ही आजवर ट्र/टेम्पो/रिक्षा/सायकल/बाबा गाडी/लुना/स्कुटीवर वाचलेली लक्षवेधी लाइन कुठली ते नमूद करा.फोटो असल्यास उत्तम, अशी विनंतही जितेंद्रने केली होती.
Image credit: Jitendra Joshi Instagram
त्याच्या विनंतीनुसार फॉलोअर्सनी देखील काही ओळी शेअर केल्या आहेत.
Image credit: Jitendra Joshi Instagram
'जा बाबा जा...तुला घाई आहे... माझ्या घरी आई आहे','कम पी मेरी रानी, मेहेंगा है इराक का पानी' अशा ओळी जितेंद्रच्या फॉलोअर्सने शेअर केल्या आहेत.