'आकाश ठोसर काय करेल...' आर्चीच्या भाजप खासदाराच्या लेकासोबतच्या VIRAL PHOTOवर नेटकऱ्याचा प्रश्न

Edited by Harshada J S Image credit: Rinku Rajguru Insta
Image credit: Rinku Rajguru Insta

सैराट सिनेमामुळे रातोरात स्टार झालेली अभिनेत्री रिंकू राजगुरू कोणत्या-न्-कोणत्या कारणांमुळे कायम चर्चेत असते. 

सैराट सिनेमातील आर्ची या पात्रामुळे रिंकूला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळाली. 

Image credit: Rinku Rajguru Insta

काही दिवसांपूर्वी रिंकू आणि आकाश ठोसर रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा सुरू होती. 

Image credit: Rinku Rajguru Insta

पण नुकतेच रिंकूचा एका तरुणासोबतचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Image credit: Rinku Rajguru Insta
Image credit: Krishnaraaj Mahadik FB 

भाजप खासदाराच्या मुलासोबत रिंकूचा फोटो व्हायरल होत असल्याने चाहत्यांना अनेक प्रश्न पडले आहेत.   

रिंकू राजगुरूच्या या व्हायरल फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. 

Image credit: Rinku Rajguru Insta

रिंकू आणि भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचा मुलगा कृष्णराज महाडिकांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

Image credit: Rinku Rajguru Insta
Image credit: Krishnaraaj Mahadik FB

कृष्णराज महाडिक यांनीच रिंकूसोबतचा फोटो फेसबुकवर शेअर केलाय.

'आज अभिनेत्री रिंकू राजगुरू कोल्हापूर येथे आल्या आणि त्यांनी करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेतले',असे कॅप्शन कृष्णराज यांनी फोटोला दिलंय.

Image credit: Krishnaraaj Mahadik FB

रिंकू-कृष्णराज यांच्या फोटोवर नेटकऱ्यांनी कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. 

Image credit: Krishnaraaj Mahadik FB 

'आकाश ठोसर काय करेल...' असा प्रश्नही एका युजरने विचारलाय. 

Image credit: Krishnaraaj Mahadik FB

'रिंकूच्या चेहऱ्यावरचे लाजणे काही वेगळच वाटते आहे पण काही असो खरच छान वाटत आहात सोबत' अशीही कमेंट एका नेटकऱ्याने केलीय.

Image credit: Krishnaraaj Mahadik FB

तर या दोघांची जोडी छान दिसत असल्याचंही अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये म्हटलंय. 

Image credit: Krishnaraaj Mahadik FB

दुसरीकडे या फोटोमुळे रिंकू-कृष्णराज यांच्या लग्नाचीही चर्चा सुरू झालीय. 

Image credit: Rinku Rajguru Insta

सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांमुळे रिंकू-कृष्णराज खरंच लग्नगाठ बांधणार आहेत का? असा प्रश्न चाहत्यांना पडलाय. 

Image credit: Rinku Rajguru Insta

आणखी वाचा

हल्ल्यात रक्तबंबाळ झालेल्या सैफला तैमूरने विचारले, तुम्ही मरणार आहात का?

marathi.ndtv.com