न्यायव्यवस्थेवर मला विश्वास, उर्मिला कोठारेनं सांगितली भीषण अपघाताची कहाणी

Edited by Harshada J S
Image credit: Urmilla Kanetkar Insta
Image credit: ANI

अभिनेत्री उर्मिला कोठारेच्या कारचा 28 डिसेंबर 2024 रोजी भीषण अपघात झाला होता. 

Image credit: ANI

अपघातात एका मजुराचा मृत्यू झाला होता तर आणखी एक जण गंभीर जखमी झाला होता. 

अपघाताच्या 13 दिवसांनंतर उर्मिलाने अपघाताची माहिती देणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केलीय. 

Image credit: ANI
Image credit: Urmilla Kanetkar Insta

इन्स्टा पोस्टमध्ये उर्मिला कोठारेने काय म्हटलंय? जाणून घेऊया सविस्तर...

Image credit: Urmilla Kanetkar Insta

28 डिसेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12.54 माझ्या कारचा भीषण अपघात झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावर दुर्घटना घडली: उर्मिला

रात्रीच्या वेळेस पोईसर मेट्रो स्टेशनजवळ मेट्रोचे काही तरी काम सुरू होते. तेथे मोठे मशीन, जेसीबी लोडर/खोदकामाचे मशीन पार्क केले होते: उर्मिला 

Image credit: Urmilla Kanetkar Insta
Image credit: Urmilla Kanetkar Insta

ड्रायव्हर कार चालवत होता. त्यावेळेस वळण दिसले नाही आणि अपघात झाला: उर्मिला 

Image credit: Urmilla Kanetkar Insta

धडकेनंतर मी आणि ड्रायव्हर गंभीरित्या जखमी होऊन बेशुद्ध झालो. सुदैवाने आम्हाला तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले: उर्मिला 

Image credit: Urmilla Kanetkar Insta

मुंबई पोलीस आणि पवन शिंदे यांनी तत्परता दाखवून आम्हाला हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आता मी घरी आहे: उर्मिला

Image credit: Urmilla Kanetkar Insta

पाठ-बरगड्यांना गंभीर दुखापत झालीय आणि किमान 4 आठवडे कोणत्याही शारीरिक क्रिया न करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिलाय: उर्मिला

Image credit: Urmilla Kanetkar Insta

बाप्पाचे आभार🙏🏼  खूप वाईट घडू शकले असते. प्रकृती लवकर सुधारण्यासाठी प्रार्थना करणाऱ्या चाहत्यांचे आणि हितचिंतकांचे आभार: उर्मिला

Image credit: Urmilla Kanetkar Insta

हा एक गंभीर अपघात होता आणि माझ्या ड्रायव्हरविरोधात पोलिसांनी एफआयआर नोंदवलाय: उर्मिला

Image credit: Urmilla Kanetkar Insta

न्यायव्यवस्थेवर मला पूर्ण विश्वास आहे. मला माहिती आहे की न्यायाचा विजय होईल: उर्मिला

आणखी वाचा

तेजश्री प्रधानची 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून एक्झिट, ही असणार नवी मुक्ता कोळी?

marathi.ndtv.com