राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्टायपेंडबाबत महत्त्वाची बातमी
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: Hasan Mushrif X राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन मिळावे यासाठी शासन कटिबद्ध आहे:वैद्यकीय शिक्षण मंत्री
Image credit: Canva यासाठी यंदाचे अनुदान वितरित करण्यात आले असल्याची माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी विधानपरिषदेत दिली.
Image credit: PTI मंत्री मुश्रीफ म्हणाले की, काही शासकीय आणि खासगी महाविद्यालयांनी आवश्यक माहिती वेळेत दिली नव्हती.
Image credit: Canva त्यामुळे शासनाने यासंदर्भात नोटीस काढून संबंधित महाविद्यालयांना सूचना दिल्या होत्या:हसन मुश्रीफ
Image credit: IANS त्या अनुषंगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी आवश्यक माहिती दिली असून पुढील काळात विद्यावेतन वेळेवर मिळावे यासाठी शासन प्रयत्नशील राहील:हसन मुश्रीफ
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासात कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी राज्य शासन सातत्याने लक्ष देत आहे, असेही ते म्हणाले.
Image credit: Hasan Mushrif X एकूणच राज्यातील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळेत विद्यावेतन देण्यात येणार अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिलीय.
Image credit: Hasan Mushrif X आणखी वाचा
Mumbai Road Problems : मुंबईतील रस्त्यांबाबत महत्त्वाची माहिती, दुर्लक्ष करू नका
marathi.ndtv.com