Mumbai Road Updates : मुंबईतील रस्त्यांबाबत महत्त्वाची माहिती, दुर्लक्ष करू नका 

Image credit: Uday Samant X

मुंबईतील रस्त्यांबाबत उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलीय. 

मुंबईतील रस्त्यांचे वेगाने काँक्रिटीकरण करणे हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे.

यासंदर्भात मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सुरू असलेल्या रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यात येणार आहे. 

Image credit: Eknath Shinde X

रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाच्या कामांचा आढावा घेण्यासाठी पुढील आठवड्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होणार आहे. 

या बैठकीत मुंबईतील सर्व आमदारांच्या मागण्या जाणून घेतल्या जातील आणि त्या लवकरच पूर्ण केल्या जातील, अशी माहितीही उद्येागमंत्री उदय सामंतांनी दिलीय. 

Image credit: Uday Samant X

मनपाच्या माध्यमातून रस्त्यांचे काँक्रिटीकरण सुरू असून काही कामांमध्ये तडे आढळून आले आहेत. 

संबंधित कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर कारवाई करण्यात आल्याचीही माहिती सामंतांनी दिलीय. 

Image credit: Uday Samant X

दोषयुक्त कामांसाठी कंत्राटदार आणि गुणवत्ता व्यवस्थापन संस्थेवर प्रत्येकी 3.37 कोटी रुपयांचा दंड ठोठावण्यात आलाय. 

पर्यवेक्षण करणाऱ्या 91 अभियंत्यांना कारणे दाखवा नोटीस देऊन त्यांचा खुलासा मागवण्यात आला आहे.

या रस्त्यांच्या गुणवत्तेसाठी थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येणार असल्याचेही उद्येाग मंत्री सामंत यांनी सांगितले.

आणखी वाचा

  प्रवास होणार सुसाट! महाराष्ट्राला मिळणार आणखी 8 नवे महामार्ग

marathi.ndtv.com