प्रसिद्ध अभिनेत्याने केला अपमान, अपार यश मिळवत मिथुन चक्रवर्तींनी घेतला बदला

Image credit: ANI

प्रसिद्ध अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

Image credit: PTI Edited by Shreerang Khare

मिथुन चक्रवर्ती यांनी यशाची चव चाखली मात्र त्यांना हे यश सहजासहजी मिळाले नव्हते.

Image credit: PTI

'मृगया' या बंगाली भाषिक चित्रपटातील भूमिकेसाठी मिथुन यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.

Image credit: PTI

मृगया सिनेमानंतर त्यांनी बॉलिवूडची वाट धरण्याचा निर्णय घेतला होता.

Image credit: PTI

1982 साली मिथुन हे नटराज स्टुडियोमध्ये पोहोचले, त्यांनी दिग्दर्शक टीएलव्ही प्रसाद यांची भेट घेतली.

Image credit: ANI

प्रसाद यांनी मिथुन यांची जितेंद्र यांच्याशी ओळख करून दिली. मिथुन यांचे हीरो होण्याचे स्वप्न आहे, हे ऐकून जितेंद्र कुत्सितपणे हसले. 

Image credit: IANS

मिथुन निराश होऊन जात असताना त्यांना जितेंद्र यांचे उद्गार ऐकू गेले. जर हा हीरो बनला तर मी संन्यास घेईन, असे जितेंद्र म्हणाले.

Image credit: ANI

1982 साली मिथुन यांचा 'डिस्को डान्सर' सिनेमा प्रसिद्ध झाला आणि या सिनेमामुळे ते रातोरात स्टार बनले.

Image credit: ANI

यानंतर मिथुन आणि जितेंद्र यांनी एकत्र कामही केले, पण मिथुन बरीच वर्षे स्वतःचा अपमान विसरले नव्हते.

Image credit: ANI

कालांतराने दोघांमधील दुरावा दूर झाला आणि दोघे एकमेकांचे मित्रही झाले.

Image credit: ANI

आणखी वाचा

  मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

marathi.ndtv.com