मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

दमदार अभिनय कौशल्य आणि हटके डान्स स्टाइलने प्रेक्षकांचे मन जिंकणारे ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत याबाबतची घोषणा केली आहे. 

Image credit: PTI

8 ऑक्टोबर रोजी 70व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यामध्ये मिथुन चक्रवर्ती यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. 

Image credit: IANS

भारतीय सिनेसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाकरिता ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. 

Image credit: IANS

पहिल्याच सिनेमासाठी मिथुन चक्रवर्तींना राष्ट्रीय पुरस्काराही मिळाला होता. 

Image credit: IANS
Image credit: ANI

1982 साली रिलीज झालेल्या 'डिस्को डान्सर' या सिनेमाने त्यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळाली. 

मिथुन यांचा जन्म 16 जून 1950 रोजी झाला असून त्यांचे खरे नाव 'गौरांग चक्रवर्ती' असे आहे. 

Image credit: ANI

बॉलिवूडसह मिथुन चक्रवर्ती यांनी विविध भाषांच्या सिनेमांमध्येही काम केले आहे. 

Image credit: ANI
Image credit: PTI

मिथुनदांनी 350हून अधिक सिनेमांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये बंगाली, उडिया, भोजपुरी, तेलुगू यासारख्या भाषांचा समावेश आहे. 

Image credit: PTI

काही महिन्यांपूर्वीच मिथुन चक्रवर्ती यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. 

आणखी वाचा

भूमी पेडणेकरचा 'हा' लुक पाहून म्हणाल: बाई! काय हा प्रकार?

marathi.ndtv.com