'शामी 19व्या मजल्यावरून बाल्कनीतून...' मोहम्मद शामीच्या मित्राने धक्कादायक माहिती केली उघड

Edited by Harshada J S Image credit: Mohammad Shami Instagram

भारतीय क्रिकेटर मोहम्मद शामीचा मित्र उमेश कुमार यांनी धक्कादायक माहिती उघड केली आहे. 

Image credit: Mohammad Shami Instagram

शुभंकर मिश्राच्या पॉडकास्टमध्ये त्यांनी सांगितले की, आयुष्याच्या एका टप्प्यावर शामी आत्महत्या करण्याचा विचार करत होता.

Image credit: Mohammad Shami Instagram

पत्नीपासून विभक्त होतानाची स्थिती शामीसाठी खूपच तणावपूर्ण होती, कारण पत्नीने शामीविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला होता. 

Image credit: Mohammad Shami Instagram

तसेच पाकिस्तानी महिलेकडून पैसे घेऊन मॅच फिक्सिंग केल्याचा आरोपही तिने शामीवर केला होता. 

Image credit: Mohammad Shami Instagram

आरोपातून निर्दोष मुक्तता झाली असली तरीही त्यादरम्यान शामीने आत्महत्येचाही विचार केला होता, असे उमेश कुमार यांनी सांगितले. 

Image credit: Mohammad Shami Instagram

पाकिस्तानसोबत मॅच फिक्सिंगचे आरोप समोर आले आणि ज्या दिवशी चौकशी झाली त्यावेळेस शामी पूर्णपणे कोलमडला- उमेश कुमार

Image credit: Mohammad Shami Instagram

सर्व काही सहन करू शकतो, पण देशाचा विश्वासघात केल्याचा आरोप सहन करू शकत नाही, असे शामी म्हणत होता. 

Image credit: Mohammad Shami Instagram

'एकेदिवशी पहाटे 4 वाजता मी पाणी पिण्यासाठी किचनकडे जात होतो, त्यावेळेस शामी मला बाल्कनीमध्ये दिसला. आम्ही 19व्या मजल्यावर राहत होतो'. 

Image credit: Mohammad Shami Instagram

मला समजले त्याच्या मनात नेमके काय सुरू आहे. शामीच्या कारर्कीदीतील ती रात्र फार मोठी होती - उमेश

Image credit: Mohammad Shami Instagram

यानंतर एकेदिवशी शामीच्या फोनवर मेसेज आला की चौकशी समितीकडून त्याला क्लीन चिट मिळाली - उमेश 

Image credit: Mohammad Shami Instagram

शामी या दिवशी इतका खूश होता की वर्ल्ड कप जिंकल्यानंतरही त्याला इतका आनंद झाला नसावा - उमेश 

Image credit: Mohammad Shami Instagram

आणखी वाचा

सानियासोबतच्या लग्नाच्या अफवेवर शामीची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला...

marathi.ndtv.com