Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (5 फेब्रुवारी 2025) महाकुंभ मेळ्यामध्ये त्रिवेणी संगमावर स्नान केले.
Image credit: PTI गंगा मातेचे आशीर्वाद घेऊन मनाला अपार शांती आणि समाधान मिळाले, अशी प्रतिक्रिया PM मोदींनी दिलीय.
Image credit: PTI महाकुंभ मेळ्यात स्नान करण्यासाठी PM मोदींनी भगव्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाचा पायजमा परिधान केला होता.
Image credit: PTI रुद्राक्षाच्या माळेने मंत्रांचा जप करत त्यांनी त्रिवेणी संगमामध्ये स्नान केले.
Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हातामध्ये,गळ्यामध्ये रुद्राक्षांच्या माळा यावेळेस पाहायला मिळाल्या.
Image credit: PTI PM मोदींनी दुधाने गंगा मातेचा अभिषेक केला आणि फुलांच्या माळा अर्पण करून आरती केली.
Image credit: PTI यानंतर पुरोहितांनी पंतप्रधान मोदींच्या कपाळावर चंदनाचा टिळा लावा आणि गंगा जलचे आचमनही करायला लावले.
Image credit: PTI संगमामध्ये स्नान केल्यानंतर PM मोदींनी विधीवत पूजाअर्चना केली.
Image credit: PTI PM मोदींनी X पोस्टमध्ये म्हटलंय की, 'प्रयागराज महाकुंभात आज पवित्र संगमात स्नान केल्यानंतर पूजा-अर्चना करण्याचे भाग्य लाभले.
Image credit: PTI PM मोदींनी देशवासीयांच्या सुख, समृद्धी, आरोग्य आणि कल्याणासाठीही प्रार्थना केली.
आणखी वाचा
17 दिवसांत लखपती बनली महाकुंभमधील Viral Girl मोनालिसा भोसले
marathi.ndtv.com