घरातच तयार करा हॉटेलस्टाइल कांदा भजी, पण बेसन नव्हे तर वापरा ही गोष्ट

Edited by Harshada J S Image credit: Canva

भजी करण्यासाठी साधारणतः बेसनचा वापर केला जातो. पण याऐवजी भजीसाठी तुम्ही डाळींचाही वापर करू शकता. 

Image credit: Canva

मूग डाळीच्या भजीची रेसिपी जाणून घेऊया...

Image credit: Canva

सामग्री- भिजवलेली बाजरी, 1 कप भिजवलेली मूग डाळ, चिरलेला कांदा-गाजर, मटार, मका, आले, हिरवी मिरची, लाल तिखट, गरम मसाला, धणे पावडर, मीठ, कोथिंबीर.

Image credit: Canva

सर्वप्रथम बाजरी आणि मूग डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करा. 

Image credit: Canva

एका बाऊलमध्ये वाटलेली पेस्ट काढा आणि त्यामध्ये अन्य सर्व सामग्री मिक्स करा. 

Image credit: Canva

एका पॅनमध्ये तेल गरम करत ठेवा आणि भजी तळून घ्या. 

Image credit: Canva

भजी तळून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये पुदिन्याच्या चटणीसह सर्व्ह करा. 

Image credit: Canva

मूग डाळीच्या गरमागरम भजीचा तुम्ही सॉससोबतही आस्वाद घेऊ शकता.

Image credit: Canva

आणखी वाचा

चेहऱ्यावर हे तेल लावले तर त्वचा दुधासारखी होईल मऊ व सतेज

marathi.ndtv.com