क्षणातच नीलकमल बोट समुद्रात बुडाली, 13 जणांचा मृत्यू
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI मुंबईमध्ये गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाकडे जाणाऱ्या बोटीचा बुधवारी (18 डिसेंबर) भीषण अपघात झाला.
Image credit: PTI नौदलाची स्पीड बोट नीलकमल नावाच्या प्रवासी बोटीला धडकल्याने भीषण दुर्घटना घडली.
Image credit: PTI नीलकमल प्रवासी फेरी बोटीच्या दुर्घटनेत 13 जणांचा मृत्यू झालाय.
Image credit: PTI नौदलाच्या स्पीड बोटीच्या इंजिनची चाचणी सुरू होती.
Image credit: PTI पण दुपारी 4 वाजेदरम्यान नौदलाच्या कर्मचाऱ्याचे स्पीड बोटीवरील नियंत्रण सुटले.
Image credit: PTI करंजाजवळ नौदलाच्या बोटीची नीलकमल बोटीला धडक बसली आणि मोठा अपघात घडला.
Image credit: PTI नीलकमल प्रवासी बोट गेट वे ऑफ इंडियाहून एलिफंटाच्या दिशेने प्रवास करत होती.
Image credit: PTI अपघातानंतर नौदलाने तटरक्षक दल आणि सागरी पोलिसांच्या मदतीने शोध आणि बचाव कार्य तातडीने सुरू केले.
Image credit: PTI बचाव कार्यात नौदलाच्या 4 हेलिकॉप्टरसह 11 बोटी, तटरक्षक दलाची एक बोट आणि सागरी पोलिसांच्या तीन बोटींची मदत घेण्यात आली.
Image credit: PTI जीव वाचवलेल्या प्रवाशांना अन्य जेटींवर हलवण्यात आले आणि तातडीने रुग्णालयात दाखल केले गेले, अशी माहिती नौदलाने दिली.
Image credit: PTI मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये सात पुरुष, चार महिला आणि दोन मुलांचा समावेश आहे.
Image credit: PTI मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, 101 प्रवाशांना वाचवण्यात आले आहेत.
Image credit: PTI दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या प्रवाशांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत CM फडणवीस यांनी जाहीर केली.
Image credit: PTI मृतांमध्ये नौदलाच्या दोन कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.
Image credit: PTI दुर्घटनेची नौदल आणि राज्य सरकारमार्फत चौकशी केली जाईल : CM फडणवीस
आणखी वाचा
शरद पवार शेतकऱ्यांसह PM मोदींच्या भेटीला, कारण...
marathi.ndtv.com