Mumbai Gokhale Bridge: अंधेरीतील गोखले पुलाची महत्त्वाची माहिती
Edited by Harshada J SImage credit: BMC
Image credit: BMC
अंधेरी पूर्व-पश्चिमेला जोडणाऱ्या गोपाळकृष्ण गोखले पूल प्रकल्पाची अतिरिक्त मनपा आयुक्त अभिजीत बांगर यांनी पाहणी केली.
Image credit: BMC
गोखले पुलाचे मुख्य काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. यामध्ये रेल्वे हद्दीतील काम,दोन्ही बाजूचे चढ-उतार मार्ग, सी.डी.बर्फीवाला पुलास जोडणाऱ्या 'कनेक्टर'च्या कामाचा समावेश आहे.
प्रा.ना.सी.फडके मार्ग आणि पुलाच्या मधल्या भागाच्या कॉंक्रिट कामाचे 'क्युरींग' पूर्ण होत आहे.
Image credit: BMC
तर र्क्रॅश बॅरियर, कठडे, रंगकाम, थर्मोप्लास्ट, कॅट आईज, विद्युत खांब, दिशादर्शक फलक आदींचे काम अंतिम टप्प्यात आहे.
Image credit: BMC
महानगरपालिका प्रशासनाने निश्चित केलेल्या कालमर्यादेत म्हणजेच 30 एप्रिल 2025 पर्यंत पूल आणि पुलाची अनुषंगिक कामे पूर्ण होत आहेत.
Image credit: BMC
वाहतूक पोलिसांसमवेत समन्वय साधून गोखले पूल वाहतुकीस खुला करण्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे बांगर यांनी स्पष्ट केले.
गोखले पुलाव्यतिरिक्त बांगर यांनी विक्रोळी रेल्वे स्थानकावरील उड्डाणपूल प्रकल्पाचीही पाहणी केली.
विक्रोळी पुलाचेही 95 टक्के काम पूर्ण झाले आहे.
Image credit: Canva
कामे पूर्ण करुन उड्डाणपूल पावसाळ्यापूर्वी नागरिकांसाठी खुला करता येईल,या अनुषंगाने बांगर यांनी निर्देश दिले आहेत.
Image credit: Canva
आणखी वाचा
महिलांच्या सुरक्षेसाठी हे काम कराच, अन्यथा कार्यालयांना बसणार 50,000 रुपयांचा दंड