बुमराहची कधी होणार वापसी? मुंबई इंडियन्सच्या हेड कोचचे मोठे विधान 

Edited by  Harshada J S Image credit: Jasprit Bumrah Insta

IPL 2025 सीझनला 22 मार्चपासून सुरुवात होणार आहे. 

Image credit: Jasprit Bumrah Insta

यादरम्यान मुंबई इंडियन्स टीमचे हेड कोच महेला जयवर्धने यांनी जसप्रीत बुमराहच्या फिटनेसबाबत मोठे विधान केलंय. 

Image credit: Jasprit Bumrah Insta

सुरुवातीच्या काही मॅचमध्ये जसप्रीत बुमराहने न खेळणे हे टीमसाठी मोठे आव्हान असेल, असे जयवर्धने यांनी म्हटलंय. 

Image credit: Jasprit Bumrah Insta

कारण बुमराह जगातील सर्वोत्तम बॉलर्सपैकी एक आहे आणि त्याने टीमसाठी कायम उत्कृष्ट कामगिरी केलीय,असेही जयवर्धने म्हणाले.

Image credit: Jasprit Bumrah Insta

बुमराह लवकरच टीममध्ये सहभागी होऊ शकेल, अशीही आशा त्यांनी व्यक्त केलीय. 

Image credit: Jasprit Bumrah Insta

बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या शेवटच्या मॅचदरम्यान बुमराहला पाठीच्या दुखापतीचा सामना करावा लागला. 

Image credit: Jasprit Bumrah Insta

तेव्हापासून बुमराहने एकही मॅच खेळलेली नाही. 

Image credit: Jasprit Bumrah Insta

बुमराहच्या प्रकृतीबाबत मेडिकल रिपोर्ट्सची प्रतीक्षा केली जातेय, असेही जयवर्धने यांनी म्हटलंय. 

Image credit: Jasprit Bumrah Insta

जसप्रीत बुमराह सध्या NCAमध्ये असून त्याच्यावर औषधोपचार सुरू आहेत.

Image credit: Jasprit Bumrah Insta

आणखी वाचा

'अडीच महिन्यात सर्वकाही बदललं' हार्दिकने सांगितला फॉर्म्युला, वाईट काळातून कसा आला बाहेर?

marathi.ndtv.com