मुंबईच्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोची सेवा सुरू, जाणून घ्या वेळ-तिकीट दर 

Edited by Harshada J S Image credit: ANI
Image credit: PM Narendra Modi X

कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो लाइन 3 या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रो मार्गिकेवरील 'आरे JVLR ते BKC' या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण करण्यात आले.

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिरवा झेंडा दाखवून या मार्गाचे शनिवारी (5 ऑक्टोबर) लोकार्पण केले. 

Image credit: ANI

पंतप्रधान मोदी यांनी बांद्रा-कुर्ला संकुलातील मेट्रो स्टेशनवरून मेट्रोला हिरवा झेंडा दाखवला. 

Image credit: ANI

यावेळेस त्यांनी बीकेसी ते सांताक्रुझ स्टेशनपर्यंत मेट्रोने प्रवास केला. 

Image credit: PM Narendra Modi X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो कनेक्ट-3 या मेट्रो सेवेच्या 'मोबाइल ॲप'चेही लोकार्पण करण्यात आले. 

Image credit: PM Narendra Modi X

आरे-बीकेसी हा मेट्रो 3 मार्ग रविवारीपासून (6 ऑक्टोबर) सुरू करण्यात आला आहे.

Image credit: ANI

नागरिकांनी आवर्जून या मेट्रोने प्रवास करावा, असे आवाहन मेट्रो प्रशासनाने केले आहे.

Image credit: PM Narendra Modi X

आरे जेव्हीएलआर ते बीकेसी मेट्रो प्रकल्प 12.69 किलोमीटरचा आहे. 

Image credit: PM Narendra Modi X

यामध्ये एकूण 10 स्टेशनचा समावेश आहे. यापैकी 9 स्टेशन अंडरग्राऊंड आहेत. 

पहिल्या टप्प्यातील या प्रकल्पाचा खर्च 14 हजार 120 कोटी रुपये इतका आहे.

पहिली ट्रेन सकाळी 6.30 वाजता तर शेवटची ट्रेन रात्री 10.30 वाजताची असेल. 

मेट्रोच्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये तर कमाल दर 50 रुपये असतील. 

आणखी वाचा

मेट्रो मार्ग आणि त्यांचे क्रमांक माहिती आहेत का?

marathi.ndtv.com