मुंबई-पुणे रेल्वे मार्ग ठप्प, मालगाडीचे निखळलं चाक Photos
Edited by Harshada J S Image credit: Mehboob Jamadar Image credit: Mehboob Jamadar मुंबई पुणे रेल्वे मार्गावर खंडाळाजवळ मंकी हील येथे मालगाडीची चाकं निखळून पडल्याने वाहतूक ठप्प झालीय.
Image credit: Mehboob Jamadar कर्जत आणि पळसधरी येथे पुण्याकडे जाणारी रेल्वे थांबवण्यात आलीय. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. रेल्वेच्या वेळापत्रकावरही परिणाम झालाय.
Image credit: Mehboob Jamadar मुंबईहुन पुण्याकडे जाणाऱ्या मेल, एक्सप्रेस, पॅसेंजर रेल्वे तसंच मालगाड्या कर्जत आणि पळसधरी मार्गावर थांबवण्यात आल्या आहेत.
Image credit: Mehboob Jamadar रेल्वे प्रशासनाचे अभियंते, अधिकारी, कामगार या ठिकाणी पावसात ट्रॅक मोकळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
Image credit: Mehboob Jamadar शुक्रवारी (11 जुलै 2025) दुपारी 2.30 वाजेच्या सुमारास बोगीची चाके निखळल्याची माहिती समोर आली.
Image credit: Mehboob Jamadar मार्ग सुरळीत होण्यासाठी साधारण रात्रीचे 8 वाजू शकतात.
Image credit: Mehboob Jamadar मुंबई-सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस, जोधपूर हडपसर, कोणार्क एक्सप्रेस या मेल एक्सप्रेस कर्जत आणि पळसधरी येथे थांबवण्यात आल्या आहेत.
Image credit: Mehboob Jamadar पुण्याकडे जाणारे दोन्ही ट्रॅक बंद ठेवण्यात आले आहेत. मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे.
आणखी वाचा
गुरुपौर्णिमेनिमित्त जळगावातील श्री व्यास मंदिरात भाविकांची गर्दी
marathi.ndtv.com