एन चंद्राबाबू देशातील सर्वाधिक श्रीमंत तर ममता सर्वात गरीब मुख्यमंत्री: ADR
Edited by Harshada J S
Image credit: PTI/ANI
आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 931 कोटी रुपयांहून अधिक संपत्ती आहे.
Image credit: PTI
असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्सने दिलेल्या माहितीनुसार (ADR) चंद्राबाबू देशातील सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरले आहेत.
Image credit: IANS
तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची एकूण संपत्ती केवळ 15 लाख रुपये आहे.
Image credit: PTI
रिपोर्टनुसार ममता बॅनर्जी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या मुख्यमंत्री ठरल्या आहेत.
Image credit: IANS
देशातील 31 मुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती जवळपास 1,630 कोटी रुपये इतकी आहे.
Image credit: xyz
अरुणाचल प्रदेशचे CM पेमा खांडू यांची एकूण संपत्ती 332 कोटी रुपयांहून अधिक आहे. यादीमध्ये खांडूंचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
Image credit: IANS
यादीमध्ये तिसऱ्या क्रमांकावर कर्नाटकचे CM सिद्धरमय्या आहेत, त्यांची एकूण संपत्ती 51 कोटी रुपयांहून अधिक आहे.
Image credit: PTI
जम्मू काश्मीरचे CM ओमर अब्दुल्ला यांची एकूण संपत्ती 55 लाख रुपये आहे, कमी संपत्ती असणारे ते दुसरे मुख्यमंत्री आहेत.
Image credit: ANI
सर्वात कमी संपत्ती असणारे तिसरे मुख्यमंत्री केरळचे CM पिनराई विजयन आहेत. त्यांची एकूण संपत्ती 1.18 कोटी रुपये आहे.
Image credit: PTI
ममता बॅनर्जी आणि आतिशी या देशातील 31 मुख्यमंत्र्यांमध्ये दोनच महिला मुख्यमंत्री आहेत.
Image credit: ANI
खांडूंवर सर्वाधिक 180 कोटी रुपयांचे कर्जही आहे. रिपोर्टनुसार सिद्धरमय्यांवर 23 कोटी रुपये तर नायडूंवर 10 कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे.
Image credit: PTI/ANI
आणखी वाचा
Exclusive: PM मोदी महायुतीच्या आमदारांसोबत करणार 'मन की बात', कुठे आणि कधी?
marathi.ndtv.com