नागपूर पेटले, दोन गटांत हिंसाचार! अंगावर शहारे आणणारे 20 PHOTOS

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

औरंगजेबची कबर हटवण्याच्या मुद्यावरून नागपुरात हिंसाचार घडला. 17 मार्चला नागपूर पेटले. 

Image credit: PTI

नागपुरातील महाल परिसरात 17 मार्चला संध्याकाळच्या सुमारास दोन गटांत राडा झाला. 

Image credit: PTI

राड्यानंतर वातावरण तापले. जमावाने जाळपोळ आणि दगडफेक केली. 

Image credit: PTI

घटनेमध्ये अनेक वाहनांचे नुकसान झाले आहे. 

Image credit: PTI

जमावाने परिसरातील अनेक वाहने जाळली आणि घरे तसेच एका क्लिनिकचीही तोडफोड केली.

Image credit: PTI

नागपुरातील दहा ठिकाणी कर्फ्यू लावण्यात आलाय.

Image credit: PTI

मध्यरात्रीपासून कर्फ्यू लावण्यात आला असून पुढील आदेशापर्यंत जारी राहील, असे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी सांगितले. 

Image credit: PTI

सध्या स्थिती शांत आहे. एक फोटो जाळण्यात आला, यानंतर लोक जमले, अशी माहिती पोलीस आयुक्तांनी दिली. 

Image credit: PTI

आम्ही गर्दीला पांगवण्याचा प्रयत्न केला, आरोपींविरोधात कडक कारवाई केली जाईल, असेही पोलीस आयुक्त म्हणाले आहेत. 

Image credit: PTI

पोलिसांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केलंय. 

Image credit: PTI

पोलीस, SRPF, RAFच्या जवानांचे एक मोठे पथक नागपुरात तैनात करण्यात आलंय. 

Image credit: PTI

नागपुरात घडलेल्या घटनेत पोलीस उपायुक्तांसह 12हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. 

Image credit: PTI

अफवांवर विश्वास ठेवू नका, प्रशासनाला सहकार्य करा; असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीसांनीही केलंय. 

Image credit: PTI

महाल परिसरात जे घडले ते चुकीचे होते. जमावाने एकत्र येऊन दगडफेक करणे हे अयोग्य आहे : CM फडणवीस 

Image credit: PTI

 मी नागपूरच्या नागरिकांना कायदा आणि सुव्यवस्थेचे पालन करण्याची विनंती करतो : CM फडणवीस

Image credit: PTI

नागपुरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून असल्याचंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

Image credit: PTI

पोलीस उपायुक्त निकेतन कदम यांच्यावर जमावातील काहींनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला : CM फडणवीस

Image credit: PTI

हल्ल्यात त्यांच्या दोन्ही हातांना गंभीर जखम झालीय. 

Image credit: PTI

दरम्यान नागपुरातील हिंसाचाराच्या घटनेवरुन विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केलीय. 

आणखी वाचा

लसूण खाण्याची योग्य पद्धत, आरोग्यास मिळतील असंख्य फायदे

marathi.ndtv.com