मातृत्व आणि कर्तव्याचे आदर्श उदाहरण, ऑन ड्युटी महिला पोलीस कर्मचाऱ्याचा Photo Viral
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर 15 फेब्रुवारी रोजी चेंगचेंगराची घटना घडली.
Image credit: PTI स्टेशनवरील चेंगराचेंगरीमध्ये 18 प्रवाशांचा मृत्यू झाला.
Image credit: PTI महाकुंभला जाणाऱ्या ट्रेनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये बदल केल्याची घोषणा करण्यात आली आणि धावपळ होऊन चेंगराचेंगरी झाल्याचे प्रत्यक्षदर्शीचे म्हणणंय.
Image credit: PTI पुन्हा अशा दुर्घटना घडू नये, यासाठी नवी दिल्ली रेल्वे प्रशासनाकडून सतर्कता बाळगण्यात येत आहे.
Image credit: PTI नवी दिल्ली रेल्वे प्रशासन पूर्णतः अलर्ट मोडवर आहे.
Image credit: PTI यादरम्यानच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Image credit: PTI एक महिला पोलीस कर्मचारी तिच्या छोट्या बाळाला घेऊन स्वतःचे कर्तव्य बजावत असल्याचे पाहायला मिळाले.
Image credit: PTI बाळाला सोबत घेऊन ड्युटी करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे कौतुक केले जात आहे.
Image credit: PTI रिपोर्ट्सनुसार रीना असे या महिला पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे.
Image credit: PTI चेंगराचेंगरीची घटना घडू नये, यासाठी रीना प्रवाशांना सतर्क करत होत्या आणि सूचनाही देत होत्या.
आणखी वाचा
FASTagचा नवा नियम जारी, वेळीच करा हे काम अन्यथा भरावे लागेल दुप्पट टोल
marathi.ndtv.com