Delhi Railway Station Stampede: एक व्यक्ती घसरल्याने चेंगराचेंगरी घडली? 

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

नवी दिल्ली रेल्वे स्टेशनवर झालेल्या चेंगराचेंगरीमध्ये 18 जणांचा मृत्यू झाला आहे. 

Image credit: PTI

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार रेल्वेच्या एका घोषणेमुळे रेल्वे प्लॅटफॉर्मवर लोकांची पळापळ झाली आणि त्यानंतर चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. 

Image credit: PTI

पण कोणतीही घोषणा केली गेली नाही, असे उत्तर रेल्वे प्रशासनाचे सीपीआरओ हिमांशु उपाध्याय यांचे म्हणणं आहे. 

Image credit: PTI

रेल्वे स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 14-15कडे जाणाऱ्या पायऱ्यांवर एक व्यक्ती घसरल्यानंतर चेंगराचेंगरी झाल्याचे उपाध्याय यांचे म्हणणंय. 

Image credit: PTI

दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचेही उपाध्याय यांनी सांगितले.

Image credit: PTI

पण केवळ एक व्यक्ती घसरल्याने इतकी मोठी दुर्घटना कशी काय घडू शकते, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 

Image credit: PTI

प्रयागराजमधील महाकुंभकरिता विशेष ट्रेन रेल्वे प्लॅटफॉर्मवर येणार होती. 

Image credit: PTI

प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार ट्रेनच्या प्लॅटफॉर्म क्रमांकामध्ये बदल करण्यात आला. यामुळे प्रवाशांनी धावाधाव करण्यास सुरुवात केली. 

Image credit: PTI

प्लॅटफॉर्मवर पोहोचण्यासाठी पायऱ्यांवर आवश्यकतेपेक्षा अधिक प्रवाशांची गर्दी झाली. 

Image credit: PTI

यानंतर धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरीची घटना घडली, असे म्हटलं जातंय.

Image credit: PTI

 शेवटच्या क्षणी प्लॅटफॉर्म बदलाची घोषणा का करण्यात आली, असा प्रश्न प्रत्यक्षदर्शी विचारत आहेत. 

Image credit: PTI

प्लॅटफॉर्मवर इतकी गर्दी होती की आरक्षित तिकीटधारक प्रवासही ट्रेनमध्ये प्रवेश करू शकले नाहीत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. 

Image credit: PTI

गर्दीमुळे लोकांचा श्वासही गुदमरू लागला.

Image credit: PTI

दुसरीकडे गर्दीचा फायदा घेत काहींनी प्रवाशांचे पाकिटांसह अन्य सामान लुटण्यास सुरुवात केली. 

Image credit: PTI

मृतांमध्ये पाच लहान मुलांचा समावेश आहे. यापैकी दोघांचे वय 10 वर्षांपेक्षाही कमी होते. 

Image credit: PTI

जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. 

Image credit: PTI

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केलाय.

Image credit: PTI

चेंगराचेंगरीची घटना 15 फेब्रुवारीला रात्री 9.55 वाजता घडल्याचे म्हटलं जातंय.

Image credit: PTI

दरम्यान दुर्घटनेमागील कारण शोधण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Image credit: PTI

नवी दिल्ली स्थानकावरील दुर्घटनेची रेल्वेने दखल घेतली असून दोषींवर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी म्हटलंय.

आणखी वाचा

क्रिकेटपटू ऋषभ पंतचा जीव वाचवणाऱ्याचे टोकाचे पाऊल, मृत्यूशी झुंज सुरू; नेमके काय घडलं?

marathi.ndtv.com