सरकारने Fastagच्या नियमांमध्ये केले मोठे बदल, नवे नियम जाणून घ्या अन्यथा समस्या वाढतील

Edited by Harshada J S Image credit: Canva

सरकारने टोल टॅक्स वसुलीकरिता फास्टॅगच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. NPCIने 1 ऑगस्टपासून फास्टॅगचे नवे नियम लागू केले आहेत. 

Image credit: Canva

फास्टॅगच्या नवीन नियमांनुसार युजर्सना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत 3 ते 5 वर्षांपूर्वी जारी केलेल्या सर्व FASTagsसाठी KYC अपडेट करणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

फास्टॅग KYC अपडेट करण्यासाठी सर्वप्रथम IHMCLच्या fastag.ihmcl.com वेबसाइटला भेट द्या.

Image credit: Canva

साइटवर रजिस्टर्ड मोबाइल क्रमांकाच्या माध्यमातून लॉग-इन करा.

Image credit: Canva

ओटीपी आणि कॅप्चा कोड सबमिट करा. कोड सबमिट केल्यानंतर नवीन विंडो ओपन होईल. 

Image credit: Canva

 My Profileवर क्लिक करा आणि FASTag KYCचे स्टेटस तपासा. KYC सेक्शनमध्ये जाऊन Customer Type निवडा. 

Image credit: Canva

सर्व आवश्यक डॉक्युमेंट्ससह डिटेल्स सबमिट करा. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुमचे FAStag KYC अपडेट होईल. 

Image credit: Canva

फास्टॅगच्या नव्या नियमांमुळे चालकांना वाहनाचे रजिस्ट्रेशन क्रमांक,चेसी क्रमांक, मालकाचा मोबाइल क्रमांक जोडावा लागेल. 

Image credit: Canva

नवीन वाहनधारकांना 3 महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. यादरम्यान फास्टॅगवर रजिस्ट्रेशन क्रमांक अपडेट करावा. 

Image credit: Canva

वाहनाचे फोटोही अपलोड करावे लागतील. फोटोमध्ये वाहनाचा पुढील भाग स्पष्ट दिसणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

आणखी वाचा

कार-बसचा भीषण अपघात, 7 जणांचा जागीच मृत्यू

marathi.ndtv.com