"महाराष्ट्रात 5 डिसेंबरला सरकार होणार स्थापन, मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत फडणवीस आघाडीवर"
Edited by Harshada J S
Image credit: ANI
महाराष्ट्रात महायुतीचे सरकार 5 डिसेंबरला स्थापन होईल, अशी माहिती भाजपच्या एका वरिष्ठा नेत्याने दिलीय.
Image credit: IANS
देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत, असेही या नेत्याने सांगितलंय.
Image credit: Devendra Fadnavis X
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर भाजपा नेत्याने शपथविधी सोहळ्याबाबतची माहिती दिलीय.
Image credit: Devendra Fadnavis X
विधानसभा निवडणुकीत महायुतीने 230 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले.
Image credit: ANI
निवडणुकीत 132 जागा जिंकून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे.
Image credit: ANI
पण 23 नोव्हेंबरला निकाल लागून इतके दिवस उलटल्यानंतरही मुख्यमंत्री कोण होणार? याबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही.
Image credit: ANI
28 नोव्हेंबरला अजित पवार, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदेंनी भाजपाध्यक्ष जे.पी.नड्डा व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली.
Image credit: ANI
दरम्यान सत्तास्थापनेमध्ये माझ्याकडून कोणतीही अडचण निर्माण होणार नाही, असे एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केलंय.
Image credit: PTI
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीनेही मुख्यमंत्रिपदासाठी फडणवीस यांना पाठिंबा दर्शवलाय.
Image credit: ANI
आणखी वाचा
PM मोदींना धमकी देणाऱ्या महिलेला मुंबईतून अटक
marathi.ndtv.com