Mango Exporter News: आंबा निर्यातदारांसाठी महत्त्वाची बातमी
Edited by Saikat Kumar BoseImage credit: Canva
कोकणातील आंबा हा जगभरात निर्यात केला जातो.
Image credit: Canva
शेतकऱ्यांना वेळोवेळी योग्य ते प्रबोधन, व्यवस्थापन, मार्गदर्शन करण्याचे काम कृषी विद्यापीठामार्फत केले जाते.
Image credit: Canva
कोकणातील आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांना कीटकनाशके,औषध फवारणी याचबरोबर निर्यात करताना घ्यावयाची काळजी, याबाबत नवीन मार्गदर्शक नियमावली केली जाईल.
Image credit: Canva
कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी विधानपरिषदेच्या लक्षवेधीच्या उत्तरात ही माहिती दिली.
Image credit: Canva
कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासंदर्भात नवीन मार्गदर्शक नियमावली केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिलीय.
Image credit: Canva
जयस्वाल म्हणाले की, कोकणातील आंबा उत्पादनाबरोबरच राज्यात वेगवेगळ्या पद्धतीची पिके घेतली जातात.
Image credit: Canva
राज्यातील पिकाचे लागवड क्षेत्रानुसार कृषी विद्यापीठामार्फत संबंधित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी कृषी विभाग समन्वय करेल, अशी माहितीही त्यांनी दिली.
Image credit: Canva
विधानपरिषद सदस्य चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, संजय केनेकर, सुनील शिंदे यांनी राज्यातील आंबा-काजू पिकाच्या निर्याती संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.