मुंबईकरांनो पाणी जपून वापरताय ना? BMCने पाणीपुरवठ्याबाबत दिली महत्त्वाची माहिती
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
वाढलेले तापमान आणि बाष्पीभवनामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांतील पाणीसाठा कमी झाला आहे.
Image credit: Canva
तरीही मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यामध्ये कोणताही परिणाम होणार नाही, असे महानगरपालिकेने स्पष्ट केलंय.
Image credit: Canva
महाराष्ट्र शासनाने देखील मुंबईसाठी निभावणी साठ्यातून (Contingency Reserve) पाणी उपलब्ध करून दिलंय.
Image credit: Canva
सद्यस्थितीचा विचार करता मुंबईकरांच्या पाणीपुरवठ्यात कपात करण्याचा कुठलाही मानस नाहीय.
Image credit: Canva
31 जुलै 2025 पर्यंत पुरेसा पाणीपुरवठा होईल, अशा रितीने नियोजन केलंय, असे महानगरपालिकेने स्पष्ट केलंय.
हवामान खात्याशी समन्वय साधून पावसासंबंधी अंदाज लक्षात घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल, असेही मनपाने सांगितलंय.
Image credit: NDTV Profit
महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी महानगरपालिका मुख्यालयात 5 मे रोजी उच्चस्तरीय बैठकीत पाणीपुरवठ्याचा आढावा घेतला.
Image credit: NDTV Profit
Image credit: NDTV Profit
5 मे 2025 रोजी सकाळपर्यंत मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांमध्ये मिळून एकूण 22.66 % पाणीसाठा उपलब्ध आहे.
Image credit: Canva
तरीही मुंबईकरांना पाण्याचा जपून आणि काटकसरीने वापर करण्याचे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आलंय.
आणखी वाचा
कोल्हापुरातील पिंक व्हिलेज राबवतंय हा आदर्श उपक्रम
marathi.ndtv.com