लाडक्या बहिणीसाठी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, आता मिळणार हे गिफ्ट
Edited by Harshada J S Image credit: Canva Image credit: CM Devendra Fadnavis X राज्यातील अंत्योदय शिधापत्रिकाधारकांसाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय.
Image credit: Canva अंत्योदय शिधापत्रिकाधारक प्रत्येक कुटुंबातील महिलेला दरवर्षी एका साडीचे वाटप करण्यात येणार आहे.
Image credit: Canva राज्याच्या अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने हा आदेश काढला आहे.
Image credit: Canva 26 जानेवारी ते 13 मार्चदरम्यान साड्यांचे वाटप करण्याचे शासनाने निश्चित केले आहे.
Image credit: Canva प्रत्येक गावातील रेशन दुकानामध्ये साड्या पोहोचवण्यासंदर्भातही आदेश देण्यात आले आहेत.
Image credit: Canva सहकार आणि पणन वस्त्रोद्योग विभागाद्वारे राज्य यंत्रमाग महामंडळांना हे आदेश देण्यात आले आहेत.
Image credit: Canva तालुका स्तरावरील गोदामापर्यंत साड्यांचा पुरवठा होईल तसे साड्यांचे वाटप करण्यात यावे, असे आदेश देण्यात आले आहेत.
Image credit: PTI साड्यांच्या वाटपाबाबत नोंदणी करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.
Image credit: Canva दरम्यान या निर्णयाला रास्त धान्य दुकानदारांनी विरोध केला आहे.
आणखी वाचा
प्रचंड थकल्यानंतरही झोप येत नाही? हा उपाय केल्यास येईल गाढ झोप
marathi.ndtv.com