Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूर हे नाव कोणी दिले? PM मोदींशी काय आहे कनेक्शन
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI Image credit: PTI Image credit: PTI पाकिस्तानी दहशतवाद्यांनी 22 एप्रिलला पहलगाममध्ये पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याला भारताने सडेतोड प्रत्युत्तर दिलंय.
Image credit: PTI 7 मे रोजी पहाटे दीड वाजण्याच्या सुमारास भारतीय सैन्याने 'ऑपरेशन सिंदूर'च्या माध्यमातून पाकिस्तानविरोधात मोठी कारवाई केली.
Image credit: PTI ऑपरेशन सिंदूर अंतर्गत सैन्याने पाकिस्तानातील दहशतवाद्यांची नऊ ठिकाणे उद्ध्वस्त केली.
Image credit: PTI 'ऑपरेशन सिंदूर' कारवाईमध्ये जवळपास 70 दहशतवांद्याचा खात्मा झालाय.
पण 'ऑपरेशन सिंदूर' हे नाव ठेवले कोणी? पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा काय संबंध आहे? जाणून घेऊया माहिती...
Image credit: PTI Image credit: PTI सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑपरेशन सिंदूर नाव हे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलंय.
Image credit: PTI पहलगाम दहशतवादी हल्ल्यात काही महिलांनी त्यांच्या जोडीदाराला गमावले.
Image credit: PTI काही महिला अशा होत्या की ज्यांचे काही दिवस किंवा काही महिन्यांपूर्वीच लग्न झाले होते.
Image credit: PTI काहींच्या हातावरील मेंदी देखील गेली नव्हती आणि अशातच दहशतवादी हल्ल्यात त्यांचे कुंकू पुसले गेले.
Image credit: PTI पाकिस्तानी दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन सिंदूर' राबवून भारतीय सैन्याने या महिलांना न्याय मिळवून दिलाय.
आणखी वाचा
मॉक ड्रिल कसे करतात? Dal Lake परिसरातील Mock Drillचे पाहा Photos
marathi.ndtv.com