पुणे होणार सुसाट! नव्या मेट्रोचा मार्ग, स्टेशनची संख्या, प्रकल्पाची किंमत वाचा एका क्लिकवर
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने पुणे मेट्रो प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला मंजुरी दिली आहे.
Image credit: PTI यामध्ये वनाज–चांदणी चौक (कॉरिडॉर 2A) आणि रामवाडी–वाघोली/विठ्ठलवाडी (कॉरिडॉर 2B) या दोन उन्नत मार्गांचा समावेश आहे.
Image credit: PTI नवीन मेट्रो मार्गांच्या माध्यमातून वनाज–रामवाडी मार्गाचे विस्तारीकरण केले जाणार आहे.
Image credit: PTI पुणे शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागाला गतिमान करण्यासाठी हे पाऊल निर्णायक ठरणार आहे.
Image credit: PTI मेट्रोच्या या प्रकल्पांची किंमत 3 हजार 626.24 कोटी रुपये इतकी आहे.
Image credit: PTI दोन्ही मार्गाची लांबी 12.75 किमी असून 13 मेट्रो स्टेशनचा यामध्ये समावेश आहे.
Image credit: PTI हे स्टेशन बावधन, कोथरूड, खराडी, वाघोलीसारख्या महत्त्वाच्या भागांना मेट्रोशी जोडतील.
Image credit: PTI हे नवीन मार्ग जिल्हा न्यायालय इंटरचेंज स्टेशनवरुन Line-1 (निगडी–कात्रज) आणि Line-3 (हिंजवडी–जिल्हा न्यायालय) यांच्याशी जोडले जाणार आहेत.
Image credit: PTI तसेच चांदणी चौक आणि वाघोली येथे आंतरशहर बससेवा मेट्रोशी जोडली जाणार आहे.
Image credit: PTI जेणेकरून मुंबई, बंगळुरू, छत्रपती संभाजीनगर अशा ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोची जोड मिळेल.
Image credit: PTI पुढील चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
महाराष्ट्रात 18 महत्त्वाकांक्षी पायाभूत प्रकल्पांची तयारी, 5 विमानतळांचाही समावेश; मुख्यमंत्र्यांनी दिले हे निर्देश
marathi.ndtv.com