प्रेग्नेंसीमध्ये कोणती फळे खाणे योग्य ठरेल?
Edited by Harshada J S
Image credit: Canva
गर्भावस्थामध्ये महिलांनी पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. डाएटमध्ये कोणकोणत्या पदार्थांचा समावेश करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती...
Image credit: Canva
आहारामध्ये बीटा कॅरेटीन, व्हिटॅमिन सी आणि फॉलिक अॅसिडयुक्त पदार्थांचा समावेश असावा.
Image credit: Canva
संत्र्यामध्ये 'व्हिटॅमिन सी' असते, ज्यामुळे शरीराला लोहाचे घटक शोषून घेण्यास मदत मिळते. जे प्रेग्नेंसीसाठीचे अतिशय महत्त्वाचे पोषक घटक आहे.
Image credit: Canva
सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी, ए आणि पोटॅशिअम यासारखे पोषणतत्त्व आहेत. ज्यामुळे पचनशक्ती सुधारण्यास, छातीतील जळजळ कमी होण्यास मदत मिळते.
Image credit: Canva
डाळिंबामध्ये लोहाचे प्रमाण अधिक असते. गर्भावस्थेदरम्यान हे फळ खाल्ल्यास शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळू शकते.
Image credit: Canva
कीवीमध्ये फॉलेट आणि व्हिटॅमिन सीचे घटक आहेत. हे घटक गर्भासाठी पोषक असतात, असे तज्ज्ञांचं म्हणणे आहे.
Image credit: Canva
Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
Image credit: Canva
आणखी वाचा
ओवा आणि काळ्या मिठाचे पाणी पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com