...तर स्वप्नीलला नेमबाजी शिकायला पाठवलं नसते, वडिलांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

Edited by Harshada J S Image credit: Swapnil Kusale Instagram

ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळेच्या वडिलांनी राज्य सरकारबाबत नाराजी व्यक्त केली. 

Image credit: Swapnil Kusale Instagram

दोन महिने उलटले तरीही राज्य सरकारने जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम मिळाली नाही, असे म्हणत स्वप्नीलच्या वडिलांनी नाराजी व्यक्त केली.

Image credit: Swapnil Kusale Instagram

कोल्हापुरात पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी ही माहिती सांगितली. 

Image credit: Swapnil Kusale Instagram

सरकारने जाहीर केलेल्या बक्षीसाची रक्कम तुटपुंजी आहे. नेमबाजांबाबत सरकार उदासीन आहे, असंही ते म्हणाले. 

Image credit: Swapnil Kusale Instagram

शिवाय हे माहिती असते तर स्वप्नीलला नेमबाजीमध्ये पाठवलेच नसते, अशीही भावना स्वप्नीलच्या वडिलांनी व्यक्त केली. 

Image credit: Swapnil Kusale Instagram

ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्वप्नीलने कांस्यपदक जिंकल्यानंतर राज्य सरकारने त्याला 1 कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर केले.

Image credit: Swapnil Kusale Instagram

पण स्वप्नीलला बक्षीसाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे त्याच्या वडिलांचे म्हणणे आहे.

Image credit: Swapnil Kusale Instagram

स्वप्नीलला उच्च दर्जाच्या सरावाची गरज आहे. त्यामुळे त्याच्या बक्षीसाच्या रकमेत वाढ करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. 

Image credit: Swapnil Kusale Instagram

आगामी ऑलिम्पिक स्पर्धेत गोल्ड मेडल मिळवायचे असेल तर स्वप्नीलला चांगल्या दर्जाची बंदूक-काडतूस उपलब्ध करून द्यावे, असेही ते म्हणाले. 

Image credit: Swapnil Kusale Instagram

आणखी वाचा

'आता रोहितने रिटायर व्हावे', चाहत्यांनी या खेळाडूसाठी उठवला आवाज

marathi.ndtv.com