ऑलिम्पिकमध्ये मेडल जिंकणारी मनु भाकर 'पिस्टल क्वीन'ची कहाणी

Edited by Harshada J S Image credit: ANI

पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये भारताने पहिले मेडल जिंकलंय आणि नेमबाज मनु भाकरने हे मेडल आणलंय.

Image credit: PTI

22 वर्षीय मनुने 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात उत्तम कामगिरी केली व कांस्य पदक पटकावलंय. 

Image credit: PTI

साऊथ कोरियाची ओ ये जिनने सुवर्ण पदक तर किम येजीने रौप्य पदक जिंकलंय.

Image credit: PTI

हरियाणातील फरीदाबादमधून पॅरिस ऑलिम्पिकपर्यंत पोहोचण्यासाठी मनुने प्रचंड संघर्ष केला. पिस्टल क्वीनशी संबंधित काही खास गोष्टी जाणून घेऊया...

Image credit: PTI

मनुने यापूर्वी 2023मध्ये एशियन गेम्समध्ये 25 मीटर फायर पिस्टल ग्रुप प्रकारात गोल्ड मेडल जिंकले. देशस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवून तिने कित्येक मेडल पटकावले आहेत. 

Image credit: PTI

शूटिंग हा खेळ मनुची पहिली पसंत नव्हती. यापूर्वी तिने रेसिंग, ताइक्वांदो, बॉक्सिंग, स्विमिंग व स्केटिंग यासारख्या खेळांमध्ये देशस्तरावरील स्पर्धांमध्ये सहभाग घेतला आहे. 

Image credit: PTI

यानंतर तिने डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला, यादरम्यान शूटिंग प्लेअर म्हणून तिच्या प्रवासास सुरुवात झाली. 

Image credit: ANI

भाकर दाम्पत्याने लेकीचे मनु हे नाव ठेवण्यामागेही महत्त्वपूर्ण कारण आहे. मनुचा जन्म झाल्यानंतर तिची आई सुमेधा यांची शिक्षक पात्रतेची परीक्षा होती. 

Image credit: AP

मनुच्या जन्माच्या 4 तासानंतर तिची आई परीक्षा देण्यासाठी पोहोचली. यादरम्यान ती मुळीच रडली नाही. याच कारणामुळे त्यांनी लेकीचे नाव मनु ठेवले. 

Image credit: ANI

झाशीच्या राणी मणिकर्णिका यांच्या नावावरून हे नाव ठेवण्यात आले आहे. त्यांना सर्वजण प्रेमाने मनु म्हणून हाक मारायचे. 

Image credit: ANI

मनुचा जन्म 18 फेब्रुवारी 2002 रोजी झाला आहे. वयाच्या 16 व्या वर्षी तिने पहिले गोल्ड मेडल जिंकले.

Image credit: PTI

2017मध्ये मनुने केरळमध्ये पार पडलेल्या नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत एअर पिस्टल प्रकारात 9 गोल्ड मेडल जिंकून रेकॉर्ड केला होता.

Image credit: PTI

मनुचे या खेळातील योगदान पाहता वर्ष 2020मध्ये अर्जुन पुरस्कार प्रदान करून सरकारने तिचा गौरव केला. 

Image credit: PTI

आणखी वाचा

Who Is Manu Bhaker : कोण आहे मनु भाकर?

marathi.ndtv.com