पाटण्यात पोलिसांकडून BPSC परीक्षार्थ्यांवर लाठीचार्ज, पाण्याचा मारा
Edited by Harshada J S Image credit: PTI Image credit: PTI बिहार लोकसेवा आयोगाची (BPSC) 70वी प्राथमिक परीक्षा (PT) रद्द करण्याच्या मागणीसाठी परीक्षार्थी रविवारी (29 डिसेंबर) संध्याकाळी रस्त्यावर उतरले.
Image credit: PTI आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर करत लाठीचार्जसह पाण्याचाही मारा केला.
Image credit: PTI या घटनेत कित्येक विद्यार्थी जखमी झाले आहेत, औषधोपचारांसाठी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय.
Image credit: PTI विद्यार्थ्यांच्या आंदोलनामुळे गांधी मैदान परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
Image credit: PTI आंदोलनासाठी परवानगी मिळालेली नसतानाही जन सुराजचे संस्थापक प्रशांत किशोर विद्यार्थ्यांसह गांधी मैदानात पोहोचले.
Image credit: PTI प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थी गांधी मैदानातून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानास घेराव घालण्यास निघाले होते.
Image credit: PTI या प्रकरणी प्रशांत किशोर, त्यांच्या पक्षाच्या अध्यक्षांसह 600-700 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Image credit: PTI BPSCद्वारे घेण्यात आलेल्या 70व्या स्पर्धा परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
आणखी वाचा
महाकुंभ मेळ्याच्या आयोजनासाठी किती खर्च केला, माहितीये का?
marathi.ndtv.com