अयोध्येमध्ये राम दरबारची प्राणप्रतिष्ठा, CM योगी आदित्यनाथांनी केली पूजा

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांनी अयोध्येतील राम मंदिरात श्री राम दरबार आणि अन्य देवांच्या मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात  सहभागी होऊन पूजा केली.

Image credit: PTI

गंगा दसऱ्याच्या मुहूर्तावर मंदिराच्या पहिल्या मजल्यावर श्री राम दरबार आणि 8 मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. 

Image credit: PTI

हिंदू धर्मग्रंथांनुसार,गंगा दसऱ्याच्या दिवशी राजा भगीरथांच्या तपश्चर्येने प्रेरित होऊन गंगा नदी भगवान शंकराच्या जटांद्वारे पृथ्वीवर अवतरली, म्हणून हा दिवस शुभ मानला जातो. 

Image credit: PTI

प्राणप्रतिष्ठा सोहळा सकाळी 11.25 वाजेपासून ते 11.40 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला होता.

Image credit: PTI

मुख्य राम दरबाराव्यतिरिक्त राम मंदिर परिसराच्या आतमध्ये आठ अन्य मंदिरांमध्येही अभिषेक करण्यात आला. 

Image credit: PTI

संपूर्ण सोहळा धार्मिक विधी आणि वैदिक मंत्रांसह पार पडला. 

Image credit: PTI

दरम्यान अयोध्येतील राम मंदिराचा प्राणप्रतिष्ठा सोहळा 22 जानेवारी 2024 रोजी PM मोदींच्या हस्ते पार पडला.

आणखी वाचा

PM मोदींनी सिंदूर रोपाची केली लागवड

marathi.ndtv.com