इंद्रायणी नदी पूल दुर्घटना, सुखरूप सुटका केलेल्या पर्यटकांचा आकडा समोर
Edited by Harshada J S
Image credit: PTI
Image credit: PTI
मावळ तालुक्यातील कुंडमळा येथे रविवारी (15 जून) जुना लोखंडी पूल कोसळून चार पर्यटकांचा मृत्यू झाला.
Image credit: PTI
यानंतर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, स्थानिक पोलीस, शिवदुर्ग संस्था तसेच स्थानिकांच्या सहकार्याने बचावकार्य सुरू करण्यात आले.
आतापर्यंत 51 पर्यटकांना सुरक्षितरित्या वाचवण्यात यश आलंय
Image credit: NDTV Marathi
घटनास्थळी बचावकार्यासाठी 25 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या आहेत.
Image credit: NDTV Marathi
स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील घटनास्थळी पोहोचून काही हायड्रा मशीन मागवल्या.
Image credit: NDTV Marathi
Image credit: NDTV Marathi
सोमवारी (16 जून) 35 जखमी पर्यटकांवर उपचार करुन त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय.
Image credit: PTI
11 जखमी रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितलंय.
Image credit: PTI
तळेगावातील ग्रामीण रुग्णालय, अथर्व हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल, युनिक हॉस्पिटल, बडे हॉस्पिटल येथे जखमींवर उपचार सुरू आहेत.
Image credit: PTI
आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी ICUतील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूसही केली.
आणखी वाचा
...तर संबंधितांवर कठोर कारवाई: उपमुख्यमंत्री अजित पवार
marathi.ndtv.com