Indrayani River Bridge Collapsed:...तर संबंधितांवर कठोर कारवाई: उपमुख्यमंत्री अजित पवार

Edited by Harshada J S Image credit: PTI
Image credit: PTI

पुण्याच्या मावळ तालुक्यातील कुंडमळा येथील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून मोठी दुर्घटना घडली. 

Image credit: PTI

दुर्घटनेदरम्यान पुलावरील 25-30 पर्यटक नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याची माहिती समोर आलीय. 

Image credit: PTI

NDRF च्या दोन तुकड्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचाव आणि मदतकार्य करत आहेत. 

Image credit: PTI

दरम्यान पुलाची अवस्था जीर्ण असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले. 

Image credit: PTI

दुर्घटनेची सखोल चौकशी करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत:DCM अजित पवार

Image credit: PTI

देखभालीबाबत कोणतेही दुर्लक्ष झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल,असाही विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलाय. 

Image credit: PTI

दरम्यान दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलंय.

Image credit: PTI

तसेच जखमींच्या उपचाराचा खर्च देखील राज्य सरकार करेल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय. 

इंद्रायणी नदीवरील पूल रविवार (15 जून 2025) संध्याकाळच्या सुमारास कोसळला आणि ही दुर्घटना घडली. 

आणखी वाचा

बस अपघात टाळण्यासाठी, महिला सुरक्षेसाठी सरकारचे मोठे पाऊल

marathi.ndtv.com