पुण्यात कोसळधार! ठिकठिकाणी झाडे पडून रस्ते बंद, शाळांना सुटी जाहीर
Edited by Harshada J S Image credit: Pratiksha P
पुण्यामध्ये पहाटेपासूनच जोरदार पाऊस सुरू आहे. हवामान विभागाने पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.
Image credit: Pratiksha P
अतिवृष्टीच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील शाळा-महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आली आहे.
Image credit: Pratiksha P
मुसळधार पावसामुळे भिडे पूल पाण्याखाली गेला आहे.
Image credit: Pratiksha P
सिंहगड रोडवरील कित्येक सोसायटींमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. ठिकठिकाणी झाडे पडल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
Image credit: Pratiksha P
आवश्यकता असेल तर घराबाहेर पडावे, अशा सूचना पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिल्या आहेत.
Image credit: Pratiksha P
मुसळधार पावसामुळे काही ठिकाणी रस्ते देखील खचले आहेत.
Image credit: Pratiksha P
आपत्ती सदृश्य परिस्थिती दिसल्यास तात्काळ आपत्ती निवारण कक्षास संपर्क साधण्याचे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
Image credit: Pratiksha P
झाड कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झालेली नाही.
Image credit: Pratiksha P
वाहनाचंही मोठे नुकसान झाले आहे.
Image credit: Pratiksha P
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. दिवसे यांनी केले आहे.
Image credit: Pratiksha P
मुसळधार पावसामुळे भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसर बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.
Image credit: Pratiksha P
पुणे शहराच्या सखल भागामध्ये पाणी साचले आहे.
Image credit: Pratiksha P
आदरवाडी गाव परिसरात डोंगर कडा कोसळल्याने रस्त्यावर मातीच माती पसरलीय. रस्ता मोकळा करण्यासाठी 5-6 तास लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
Image credit: Pratiksha P आणखी वाचा
भल्यामोठ्या खड्ड्यांमुळे नवी मुंबईकर त्रस्त, अपघातांचाही धोका
marathi.ndtv.com