बस अपघात टाळण्यासाठी, महिला सुरक्षेसाठी सरकारचे मोठे पाऊल
Edited by Harshada J SImage credit: DCM Eknath Shinde X
Image credit: DCM Eknath Shinde X
तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट ई बस लवकरच एसटीच्या ताफ्यात दाखल होतील,असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केलाय.
भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या 5 हजार बसपैकी दरवर्षी किमान 1 हजार बस या ई-बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
Image credit: DCM Eknath Shinde X
ई-बसेस AI तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित कंपनीला देण्यात आल्या आहेत.
Image credit: DCM Eknath Shinde X
Image credit: Pratap Sarnaik X
नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालीवर लक्ष ठेवणारे AI तंत्रज्ञानावर आधारित CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
गाडी चालवताना जर चालक जांभई देत असेल, त्याला डुलकी लागत असेल, झोप येत असेल किंवा मोबाइल वापरत असेल तर कॅमेरे प्रवाशांना अलर्ट करतील.
Image credit: Pratap Sarnaik X
तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई- बसेसमध्ये असणार आहे.
Image credit: Pratap Sarnaik X
महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठीही बसमध्ये दोन CCTV कॅमेरे बसवण्यात येणार आहेत.
Image credit: Pratap Sarnaik X
बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्निशामक यंत्रणा बसमध्ये असावी, असे मत यावेळी मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केले.
Image credit: Pratap Sarnaik X
याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बसही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही: मंत्री सरनाईक
Image credit: Pratap Sarnaik X
तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई-बसमध्ये बसवण्यात येणार असल्याचेही परिवहन मंत्र्यांनी सांगितले.
Image credit: Pratap Sarnaik X
आणखी वाचा
नवी मुंबईतील कोट्यधीश पोलीस, बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी गुन्हा दाखल