भाजप आमदाराचा खास माणूस, गर्भवती पत्नीसाठी वणवण; जे घडलं ते शत्रूसोबतही होऊ नये
Edited by Harshada J S
Image credit: Canva
Image credit: Canva
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल प्रशासनाच्या मुजोरपणामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झालाय.
भाजप आमदार अमित गोरखे यांनी हा आरोप केलाय.
Image credit: Sushma Andhare FB
मोनाली सुशांत भिसे असे मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे.
अमित गोरखेंनी दिलेल्या माहितीनुसार, दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाने महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करुन घेण्यासाठी 10 लाख रुपयांची मागणी केली.
Image credit: Sushma Andhare FB
Image credit: Canva
तीन लाख रुपये भरण्याची तयारी असतानाही महिलेला हॉस्पिटलमध्ये दाखल करून घेण्यात आले नाही.
Image credit: Canva
मंत्रालयातून फोन गेल्यानंतरही हॉस्पिटल प्रशासनाने महिलेला हॉस्पिटलमध्ये भरती करुन घेतले नाही, असेही गोरखेंनी सांगितले.
Image credit: Canva
गंभीर शस्त्रक्रिया असल्याचे कारण महिलेच्या कुटुंबीयांना देण्यात आले.
Image credit: Canva
धावपळीत महिलेला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जावं लागलं, तिथे औषधोपचार करण्यात आले.
महिलेने जुळ्या मुलांना जन्म दिला पण आईचा मृत्यू झाला, याविरोधात गोरखे यांनी रोष व्यक्त केलाय.
Image credit: Canva
Image credit: Canva
दरम्यान येत्या अधिवेशनात हा मुद्दा मांडणार असल्याचंही गोरखेंनी म्हटलंय.
Image credit: Canva
तसेच याविरोधात कठोर पावलं मुख्यमंत्र्यांसह सर्वांनी उचलावी, अशी विनंती करणार असल्याचंही गोरखेंनी म्हटलंय.
मोनाली यांचे पती सुशांत भिसे हे आमदार अमित गोरखेंचे स्वीय सहाय्यक आहेत.
Image credit: Sushma Andhare FB
आणखी वाचा
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक, बँकांना दिला थेट इशारा
marathi.ndtv.com