राज ठाकरेंच्या आदेशानंतर मनसैनिक आक्रमक, बँकांना दिला थेट इशारा
Image credit: PTI
Image credit: PTI
गुढीपाडवा मेळाव्यावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मराठी न बोलणाऱ्यांना थेट इशारा दिलाय.
Image credit: PTI
आमच्या राज्यात येऊन आम्हाला सांगणार असाल की मराठी बोलणार नाही, कानफाट फोडेन त्यांचं : राज ठाकरे
Image credit: PTI
उद्यापासून बँकांमध्ये जाऊन मराठी कारभार होत आहे का हे बघा. नसेल तर त्यांना करायला लावा:राज ठाकरे
Image credit: PTI
राज ठाकरेंच्या आदेशानंतर मीरा भाईंदरमधील मनसैनिक आक्रमक झाले आहेत.
भाईंदर पश्चिमेकडील ICICI, HDFC, SVC, IDFC बँकांच्या व्यवस्थापनेला मराठी भाषेचा वापर करण्याचे निवेदन देण्यात आलंय.
मीरा-माईंदर मनसे उपजिल्हा अध्यक्ष हेमंत सावंतांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले.
लेखी निवेदन देऊन सर्व कामकाज मराठी भाषेत करावे अन्यथा मनसे स्टाइल दाखवू, असा इशारा देण्यात आलाय.
सूचनांचे पालन करण्यात यावे अन्यथा मनसे स्टाइलने उत्तर देण्यात येईल, असेही मनसैनिकांनी स्पष्ट केलंय.
दुसरीकडे 'मराठी गया तेल लगाने' असे म्हणणाऱ्या पवईतील L&Tच्या सुरक्षारक्षकालाही मनसैनिकांनी अद्दल घडवलीय.
आणखी वाचा
18 जणांचा जळून कोळसा, कोट्यवधींच्या संपत्तीची राख; भीषण अग्नितांडवाचे Photos
marathi.ndtv.com