संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांची पालखी पुण्यात दाखल 

Edited by Harshada J S Image credit: Pune City Traffic Police X 
Image credit: Pune City Traffic Police X 

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची पालखी पुणे शहरात दाखल झाली आहे.

Image credit: Pune City Traffic Police X 

टाळ मृदुंगाच्या गजरात दोन्ही पालख्यांचे पुण्यामध्ये आगमन झाले.

Image credit: Pune City Traffic Police X 

दोन्ही पालख्यांचा आज पुण्यामध्ये मुक्काम असणार आहे. 

Image credit: Pune City Traffic Police X 

संत तुकाराम महाराजांच्या पालखीने देहूमधून तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीने आळंदीहून पुण्याकडे प्रस्थान केले होते.

Image credit: Pune City Traffic Police X 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज (20 जून) रात्री 10 वाजता या दोन्ही पालख्यांचे दर्शन घेतील. 

Image credit: Pune City Traffic Police X 

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या दौऱ्यानिमित्त तसेच गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनातर्फे सतर्कता बाळगली जात आहे. 

Image credit: Pune City Traffic Police X 

दुसरीकडे पुण्यनगरी आता वारकरीमय झालेली आहे.

Image credit: Pune City Traffic Police X 

पुण्यात वारकऱ्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

Image credit: Pune City Traffic Police X 

शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आणि प्रत्येक क्षणावर बारीक लक्ष ठेवण्यासाठी पुणे वाहतूक पोलीस अविरतपणे कार्यरत आहेत.

आणखी वाचा

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्याच्या वाहतुकीत बदल! तारीख-मार्गांची माहिती एका क्लिकवर

marathi.ndtv.com