बंगळुरूमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत, IMDकडून यलो अलर्ट जारी
Edited by Harshada J SImage credit: PTI
बंगळुरूमध्ये 18 मे रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालंय.
Image credit: PTI
Image credit: PTI
रस्त्यांवर तसेच निवासी भागातही पावसाचे पाणी साचलंय.
बंगळुरुमध्ये पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
Image credit: PTI
Image credit: PTI
गेल्या तीन दिवसांपासून बंगळुरूमध्ये मुसळधार पाऊस सुरू असल्याची माहिती गृहमंत्री जी परमेश्वर यांनी दिलीय.
Image credit: PTI
बीबीएमपीचे कर्मचारी-अधिकारी रस्त्यांवर साचलेले पाणी, पडलेले झाडे-फांद्या हटवण्याचे काम करत असल्याचीही माहिती गृहमंत्र्यांनी दिलीय.
Image credit: PTI
काही ठिकाणी पावसामुळे चार ते पाच फूट इतके पाणी साचलंय.
Image credit: PTI
IMDकडून यलो अलर्ट जारी करण्यात आल्याने काही भागात तात्पुरता वीजपुरवठा खंडित होऊ शकतो.
Image credit: PTI
IMDचे बंगळुरु केंद्राचे संचालक एन.पुवियारसुंनी सांगितले की, चक्रीवादळ वाऱ्यांच्या आताच्या स्थितीनुसार कर्नाटकात विशेषतः किनारी भागात मुसळधार पाऊस पडेल.
Image credit: PTI
पुढील दोन दिवस बंगळुरुमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे, अशीही माहिती पुवियारसु यांनी दिलीय