केमिकलचा टँकर ट्रकला धडकला आणि मोठा भडका उडाला, भीषण अग्नितांडवाचे PHOTOS
Edited by Harshada J S Image credit: PTI
जयपूर-अजमेर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (20 डिसेंबर) पहाटे भीषण दुर्घटना घडली.
Image credit: PTI
जयपूरमधील भांकरोटा येथे पेट्रोल पंपजवळ गॅस टँकरचा स्फोट झाल्यानं भीषण आग लागली.
Image credit: PTI
दुर्घटनेत 8 जणांचा मृत्यू झालाय तर 35 हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती समोर आलीय.
Image credit: PTI
गॅस टँकरसह 10 हून अधिक वाहनांना आग लागल्याने ही दुर्घटना घडल्याचे म्हटले जात आहे.
Image credit: PTI
गॅस टँकर आणि ट्रकची धडक झाल्याने एका पाठोपाठ एक स्फोट होत गेले, अशी माहिती आहे.
Image credit: PTI
राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
Image credit: PTI
मुख्यमंत्री शर्मांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली आणि दुर्घटनेची सखोल चौकशी केली जाईल, असेही सांगितले.
Image credit: PTI
अशा स्वरुपाचे अपघात कसे रोखता येतील, यावर सरकार नक्कीच विचार करेल;असेही मुख्यमंत्री शर्मा यांनी म्हटलंय.
Image credit: PTI
उपमुख्यमंत्री प्रेमचंद बैरवा, गृहराज्यमंत्री जवाहर सिंह बेढम, जिल्हाधिकारी जितेंद्र सोनींसह अन्य अधिकाऱ्यांनीही घटनास्थळास भेट दिली.
Image credit: PTI
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केमिकलने भरलेल्या ट्रकची अन्य वाहनांना धडक बसली आणि मोठा अपघात घडला.
Image credit: PTI
दुर्घटनेत प्रवाशांनी भरलेल्या एका बसला देखील आग लागली.
Image credit: PTI
दुर्घटनेतील जखमींना सवाई मानसिंह हॉस्पिटलमधील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
Image credit: PTI
अग्नितांडवामुळे जयपूर एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
Image credit: PTI
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी CM शर्मा यांच्याशी फोनवर संवाद साधून दुर्घटनेची माहिती जाणून घेतली.
Image credit: PTI आणखी वाचा
क्षणातच नीलकमल बोट समुद्रात बुडाली, 14 जणांचा मृत्यू
marathi.ndtv.com