रक्षाबंधनावर भद्राकाळाचे सावट, कोणत्या मुहूर्तावर भावाला बांधावी राखी?

Edited by Harshada J S Image credit: Canva
Image credit: Canva

यंदा 19 ऑगस्टला रक्षाबंधनाचा सण साजरा केला जाणार आहे. पण या शुभदिनी भद्रकाळाचे सावट आहे. हा काळ शुभ मानला जात नाही.

Image credit: Canva

रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक. भाऊ बहिणीला तिचे रक्षण करण्याचे वचन देतो तर बहीण भावाला उदंड आयुष्य लाभावे अशी प्रार्थना करते. 

Image credit: Canva

यंदा रक्षाबंधनाच्या दिवशी पहाटे 3.04 वाजेपासून ते रात्री 11.55 वाजेपर्यंत भद्रकाळाचे सावट आहे. 

Image credit: Canva

भद्रकाळामध्ये भावाच्या मनगटावर राखी बांधणे अशुभ मानले जाते. यंदाच्या रक्षाबंधनाच्या दिवशी चंद्र मकर राशीमध्ये असल्याने भद्राचे पाताळात निवास असेल. 

Image credit: Canva

भद्राचे निवास पाताळात असले तरीही या काळात राखी बांधू नये. अशा परिस्थितीत शुभ मुहूर्त जाणून घेणे आवश्यक आहे. 

Image credit: Canva

यंदा रक्षाबंधनाचा सर्वश्रेष्ठ मुहूर्त दुपारी 1.30 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असणार आहे. 

Image credit: Canva

त्यामुळे याच मुहूर्तादरम्यान रक्षाबंधन सण साजरा केला जाऊ शकतो. 

Image credit: Canva

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

आणखी वाचा

राशीनुसार भावाला कोणत्या रंगाची राखी बांधावी? जाणून घ्या महत्त्वपूर्ण माहिती

marathi.ndtv.com