पत्नीला खूश ठेवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स
Edited by Harshada J S Image credit: Canva
कोणतेही नाते पैशांवर नव्हे भावनांवर टिकून असते. पती-पत्नीचे नातंही असेच असते. पत्नी खूश असेल तर वैवाहिक जीवन सुखमय असते.
Image credit: Canva
व्यस्त वेळापत्रकामुळे पती-पत्नीला एकमेकांसाठी वेळ काढणं कठीण होते. यामुळे नात्यातील तणाव वाढतो. ही समस्या दूर करण्यासाठी लक्षात ठेवा काही टिप्स...
Image credit: Canva
पत्नीप्रतिचे प्रेम आणि भावना शब्दांत मांडण्यास सुरुवात करा. याद्वारे पती-पत्नी एकमेकांशी भावनिकरित्या जोडले जातील.
Image credit: Canva
पत्नीशी रोज स्वतःहून संवाद साधा. दिवसभराच्या घडामोडी तिला सांगा, तिची विचारपूस करा. यामुळे नात्यातील गैरसमज दूर होतील.
Image credit: Canva
घर-मुलांच्या जबाबदारीबाबात पत्नीसोबत चर्चा करा आणि घरातील प्रत्येक कामामध्ये पत्नीला मदत करण्याचा प्रयत्न करावा.
Image credit: Canva
पिकनिक प्लान करत राहा, यामुळे तुम्हा दोघांना एकमेकांसोबत वेळ घालवता येईल.
Image credit: Canva
पत्नी त्रस्त असेल तर तिच्याशी संवाद साधा. तिच्या भावना, इच्छा, म्हणणे समजून घेण्याचा प्रयत्न करा.
Image credit: Canva
ऑफिसशी संबंधित समस्या असतील त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा.
Image credit: Canva
पत्नीला छोटे-मोठे सरप्राइज देण्याचा प्रयत्न करा. आवडीचे फुल, एखादी गोष्ट, आवडती डिश इत्यादी गोष्टी तिच्यासाठी मागवा.
Image credit: Canva आणखी वाचा
चण्याच्या पिठाचे सरबत पिण्याचे फायदे
marathi.ndtv.com