'आम्ही साधं झुरळही मारले नाही...',धमकीसत्रादरम्यान वडील सलीम खान यांची प्रतिक्रिया

Edited by Harshada J S Image credit: Varinder Chawla

राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आलीय. 

Image credit: Salman Khan Insta

बिश्नोई गँगने बाबा सिद्दीकींची हत्या केल्याचा दावा केला आहे. यादरम्यान 18 ऑक्टोबरला सलमान खानला पुन्हा धमकी मिळाली. 

Image credit: Salman Khan Insta

पण सिद्दीकींच्या हत्येचा सलमान खानशी कोणताही संबंध नाही, असे सलमानचे वडील सलीम खान यांनी म्हटले आहे. 

Image credit: Salman Khan Insta

एबीपी वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सलीम खान यांनी हे विधान केले आहे.

Image credit: Salman Khan Insta

माझ्या कुटुंबीयांना सलमान-सिद्दीकींच्या हत्येमध्ये कोणताही संबंध दिसत नाही. संबंध कसा जोडला जातोय, हे समजत नाही- सलीम खान

Image credit: Salman Khan Insta

सलमान माफीही मागणार नाही. कारण त्यानं कधीही जनावराची शिकार केलेली नाही, असेही सलीम खान यांनी स्पष्ट केलंय. 

Image credit: Salman Khan Insta

वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे आमचे कुटुंबीय त्रासले आहेत - सलीम खान

Image credit: Salman Khan Insta

सलमानने कधीही कोणतेही जनावर मारले नाही, आम्ही साधं झुरळही मारलं नाही, असेही सलीम खान यांनी स्पष्ट केले.

Image credit: Salman Khan Insta

आणखी वाचा

...तर सलमान खानची अवस्था बाबा सिद्दीकीपेक्षाही वाईट होईल, धमकीसत्र सुरूच

marathi.ndtv.com